राज्यातील बचतगट आता होणार “हायटेक’ 

सॅनफ्रान्सिस्को  – राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या समवेत बचतगटांच्या महिलांनी सॅनफ्रान्सिस्को येथे फेसबुक मुख्यालयाला भेट दिली. यावेळी व्हॉट्‌सऍप व टीआयई संस्थेलाही त्यांनी भेट दिली. ग्रामीण बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी या दोन्ही माध्यमांचा वापर प्रभावीपणे करण्यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत काम करण्याचे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले.

फेसबुक आणि व्हॉट्‌सऍप यासारख्या समाजमाध्यमांना, त्यांच्याकडील तंत्रज्ञान भारतातील आणि राज्यातील महिलांना देऊन त्यांना त्यांच्यातील कौशल्यांना जगासमोर मांडण्यासाठी महाराष्ट्र सरकार बरोबर काम करण्याचे आवाहन मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी केले. येथील अद्ययावत माहिती घेऊन ग्रामीण भागातील बचतगट हायटेक झाल्याशिवाय राहणार नाहीत, असे त्या म्हणाल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)