हुंडा विरोधी सप्ताहानिमित्त राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा

मुंबई: हुंडा विरोधी चळवळ, मुंबई ही सामाजिक संस्था हुंडा प्रथेविरोधात ४६ वर्षांपासून विविध उपक्रम राबवत आहे. संस्थेतर्फे २६ नोव्हेंबर रोजी ३० वर्षांपासून हुंडा विरोधी दिवस व त्या नंतरच्या सप्ताहात युवापिढीसाठी विविध जाणीव जागृतीचे कार्यक्रम आयोजित केले जातात. वर्ष २००६ पासून महाराष्ट्र शासनानेही शासकीय पातळीवर या उपक्रमास पाठिंबा दिला आहे.

स्त्री पुरुष समानता आणि सर्वाना समान संधी ही प्रमुख वैशिष्ठे असणारी राज्यघटना भारतीय लोकांनी, लोकांसाठी बनवली आणि स्विकारली तो दिवस २६ नोव्हेंबर. वरील दोन्ही प्रमुख आणि वैशिष्ठ्यपूर्ण तत्वांना छेद देणारी हुंडा ही दुष्ट रूढी आजही अनेक जीव व कुटुंबे उध्वस्त करत आहे. म्हणून हुंडा प्रथेविरोधात युवा पिढीची मानसिकता तयार व्हावी यासाठी युवकांना या विषयावर विचार करायला लावून बोलते करण्यासाठी दर वर्षी आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या जातात.

या उपक्रमाचे यंदा ३१ वे वर्ष असून रविवार दिनांक ९ डिसेम्बर २०१८ रोजी सकाळी १० वाजता विलेपार्ले (पूर्व) मुंबई येथे सकाळी १० वाजता साठ्ये महाविद्यालयात राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या आहेत. महाराष्ट्रातील सर्व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. प्रथम क्रमांकाच्या महाविद्यालयाला राजेंद्र शिल्ड, विद्यार्थ्याला ट्रॉफी तसेच तीन रोख पारितोषिके रु.२५००/-, १५००/- व १०००/- आणि दहा प्रशस्तिपत्रे दिली जातील.

अधिक माहितीसाठी संपर्क : आशा कुलकर्णी, महासचिव – हुंडा विरोधी चळवळ, ४/५० विष्णू प्रसाद सोसायटी, शहाजी राजे मार्ग, स्वातंत्र्य सैनिक मामासाहेब कुलकर्णी चौक, विलेपार्ले (पूर्व) मुंबई ४०० ०५७.

दूरध्वनी :०२२-२६८३६८३४ / २६८३६१३२ भ्रमणध्वनी : ९८१९३७३५२२ / ९८१९५३९१९३.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)