राज्यात दुष्काळाची परिस्थिती भिषण : धनंजय मुंडे

सरकारने तातडीने दुष्काळ जाहिर करावा 
मुंबई: मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात या वर्षी अभुतपुर्व आणि भिषण दुष्काळाची परिस्थिती असताना अनेक विषयांवर बोलणारे मुख्यमंत्री दुष्काळाच्या प्रश्नावर गप्प का? असा सवाल करीत सरकारी कागद रंगवण्यापेक्षा तातडीने दुष्काळ जाहिर करा अशी आग्रही मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
मराठवाड्यात यावर्षी पावसाअभावी भिषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांची पेरणी वाया गेली असुन, आलेली थोडीफार पीके ही करपुन आणि विविध रोगांनी ग्रासली आहेत. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्‍चिम महाराष्ट्रातही अशीच परिस्थिती असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेती सोबतच पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न आता पासुनच गंभीर बनला आहे. या संदर्भात त्यांनी दोन ट्विट करून अशा गंभीर परिस्थितीत मुख्यमंत्री गप्प का? असा सवाल उपस्थित केला आहे.
गेल्या पंधरा दिवसात मुख्यमंत्री सातत्याने मुंबई, बिल्डरांचे प्रश्न, विविध ठिकाणांच्या मेट्रोंच्या प्रश्नावर बोलत आहेत. मात्र आमचा मराठवाडा आणि राज्यातील बळीराजा ज्या दुष्काळाने होरपळुन निघत आहे त्यांच्याबद्दल आपण वारंवार मागणी करूनही एक चकार शब्दही का बोलत नाहीत. सरकारचे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे धोरण आहे का? असा सवाल उपस्थित करतांनाच सरकारने केवळ सरकारी कागदे न रंगवता तातडीने दुष्काळ जाहिर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. अन्यथा या राज्यातील शेतकरी जगणार नाही, अशी भितीही मुंडे यांनी व्यक्त केलीे.
सक्तिची वीजबील वसूली थांबवा… 
सरकारने केलेल्या कर्जमाफीची अद्याप निट अंमलबजावणी नाही, मागील काळातील नैसर्गिक आपत्तींमधील जाहिर अनुदान अद्याप वाटप झालेले नाही. पिक विम्याचाही घोळ आहे आणि सरकार दुसरीकडे सक्तीची विजबील वसुली करीत आहे. खते बि बियाणांच्या किमती वाढवुन त्यांच्या जखमेवर मीठ चोळत असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे. सरकारने तातडीने दुष्काळ जाहिर करावा आणि खते, बी-बियाणे यांच्या किमती वाढवल्या आहेत त्या कमी कराव्यात. या वर्षीचे वीजबील माफ करावे, सक्तीची विजबील वसुली थांबवावी, दुष्काळी भागातील विद्याथ्रयांची परिक्षा शुल्क, शैक्षणिक शुल्क माफ करावे, हमीभाव खरेदी केंद्र तातडीने सुरू करावीत, अशा मागण्याही मुंडे यांनी केल्या आहेत.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)