पीएसआय नियुक्ती रद्द प्रकरणी राज्य सरकार मार्ग काढणार : मुख्यमंत्र्यांची ग्वाही 

औरंगाबाद:  नियुक्ती रद्द झालेल्या अनुसूचित जाती जमातीतील 154 पीएसआय प्रकरणी उच्च न्यायालयात जायचे की अन्य दुसरा पर्याय काढायचा याबाबत आमचा प्रयत्न सुरु आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते औरंगाबादमध्ये बोलत होते. नियुक्ती रद्द झाल्याने मॅटने 154 पीएसआयना त्यांच्या मूळ पदावर पाठवले आहे. त्यामुळे 9 महिन्यांचे प्रशिक्षण घेऊनही या पीएसआयना आता मूळ पदावर जावे लागले.
त्याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, मॅटचा निर्णय आला आहे. पण राज्य सरकार त्यातून मार्ग काढत आहे. कारण या पीएसआयनी ट्रेनिंग पूर्ण केले आहे. त्यामुळे मी विधी व न्याय विभागाला सांगितले आहे. त्यामुळे हायकोर्टात आव्हान द्यायचे की दुसरा मार्ग काढायचा याबाबतचा आमचा प्रयत्न सुरु आहे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, पदोन्नतीमधील आरक्षण बेकायदेशीर असल्याचे सांगत मॅटने राज्यातील 154 अनुसूचित जाती जमातीतील फौजदारांची नियुक्ती रोखली आहे. तसेच या सर्वांना त्यांच्या मूळ जागी नियुक्त करावे किंवा नियुक्तीच्या प्रतीक्षेत ठेवण्याचा आदेशही मॅटने दिला आहे. या निर्णयामुळे प्रशिक्षण पूर्ण करुन नियुक्तीसाठी उत्सुक असलेल्या प्रशिक्षणार्थींमध्ये निराशा पसरली आहे.
तसेच खात्याअंतर्गत सरळसेवा पद्धतीने निवड होऊनही, आमची निवड पदोन्नतीने झाल्याचे परिपत्रक का काढले? असा सवाल 154 उमेदवारांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात तात्काळ पावले उचलावीत, अशी विनंती या उमेदवारांनी केली आहे. महत्त्वाचे म्हणजे नियुक्ती रद्द झालेल्या 154 जणांमध्ये प्रशिक्षणामध्ये दुसरा आलेल्या उमेदवाराचाही समावेश आहे.
कोणावरही अन्याय होणार नाही – मुनगंटीवार 
राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याप्रकरणी कोणावरही अन्याय होणार नाही, असा दावा केला. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, कोर्टाच्या संदर्भातील काही निर्णय आल्यानंतर असे प्रसंग उद्भवतात, पण मुख्यमंत्र्यांचं याकडे लक्ष आहे. मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली. येणाऱ्या काळात कोणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी सरकार घेईल. असे कायदेशीर प्रसंग येतात, तेव्हा विधी व न्याय विभाग संबंधित कायदेशीर निर्णयाची पडताळणी करते, अभ्यास करते आणि सर्वांना न्याय देण्याच्या दृष्टीकोनातून एक सर्वंकष विचार होत असतो. यावर तोडगा निघायला किती दिवस लागतील, किती तास लागतील हे सांगता येणार नाही. पण कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. 
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)