राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवलेली व्यक्ती पंतप्रधानपदासाठी योग्य – शत्रुघ्न 

पाटणा – भारतीय जनता पक्षामध्ये असताना पक्षनेतृत्वावर उघडपणे टीका करण्यामुळे सतत माध्यमांच्या प्रकाशझोतात असणाऱ्या शत्रुघ्न सिन्हा यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असला तरी आपली स्पष्टवक्तेपणाची सवय मात्र सोडलेली दिसत नाही. काही दिवसांपूर्वीच शत्रुघ्न सिन्हा यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या सुप्रीमो मायावती हे ‘पंतप्रधानपदाचे मटेरियल’ आहेत असं वक्तव्य केलं होत. शत्रुघ्न सिन्हा यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या गोटामध्ये मात्र अस्वस्थता पसरली होती.

दरम्यान, आज शत्रुघ्न सिन्हा यांनी आपल्या वक्तव्यावरून एक पाऊल मागे घेताना “मुख्यमंत्री पदाचा अनुभव असलेला कोणताही राजकीय नेता पंतप्रधान पदासाठी लायक आहे.” असं वक्तव्य केलं आहे. यावेळी बोलताना सिन्हा यांनी, “पंतप्रधान होण्यासाठी असे काही विशेष गुण असण्याची आवश्यकता नसते. तुमच्याकडे जर आवश्यक असे संख्याबळ असेल तर तुम्ही देखील पंतप्रधान बनू शकता.”

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)