वैयक्‍तिक कर्जावरील प्रक्रिया शुल्कात स्टेट बॅंकेकडून सूट 

नवी दिल्ली – स्टेट बॅंक ऑफ इंडियाने दिवाळी निमित्त ग्राहकांना पर्सनल लोनवरची प्रोसेसिंग फी शून्य केली आहे. ग्राहकांना आता कर्ज घेण्यासाठी कोणतही शुल्क द्याव लागणार नाही. या ऑफरचा फायदा 30 नोव्हेंबरपर्यंत घेता येणार आहे. एसबीआयनं कर्ज घेण्यातल्या प्रक्रियेतील शुल्क संपवले आहेत. 30 नोव्हेंबरपर्यंत पर्सनल लोन घेणा-यांना यासाठी कोणतही अतिरिक्त शुल्क मोजावे लागणार नाही.

बॅंका या 10 ते 18 टक्‍क्‍यांनुसार पर्सनल लोन ग्राहकाला देत असतात. पर्सनल लोनवरही व्याजाचे दर ग्राहकांच्या उत्पन्नानुसार ठरतात. तुम्ही नोकरी करता, पगार किती आहे. तसेच तुम्ही ज्या बॅंकेतून कर्ज घेताय त्या बॅंकेत तुमचं सॅलरी अकाऊंट आहे काय, यावरही तुमच्या लोनवरचे शुल्क निर्भर आहे. एसबीआयच्या माहितीनुसार, पर्सनल लोनवरचा व्याजदर दर दिवशी अन्‌ महिन्याला बदलत असतो. पर्सनल लोनवरचा इंटरेस्ट रेट उर्वरित कर्जाच्या रकमेवर निर्भर असतो. त्यामुळे तुमच्या कर्जावरचं व्याजही कमी होतं. पर्सनल लोनमध्ये सुरुवातीला तुमच्या कर्जाच्या रकमेवर महिन्याचा इंटरेस्ट रेट कॅलक्‍युलेट केला जातो. तसेच या इंटरेस्ट रेटचा तुमच्या ईएमआयवरही फरक पडत असून, ग्राहकांना याचा फायदा पोहोचणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)