साहित्य संमेलनास आजपासून प्रारंभ

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीच्या हस्ते होणार उद्‌घाटन

साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांचा राजीनामा मंजूर

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यवतमाळ: वादग्रस्त ठरलेल्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उद्यापासून प्रारंभ होणार आहे. या संमेलनाचे उद्‌घाटन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती साहित्य महामंडळाने दिली आहे. तसेच साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांचा राजीनामा स्वीकारल्याचेही जाहीर करण्यात आले आहे.

नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्याबाबतचे सर्व आरोप संमेलनाचे स्वागताध्यक्ष मदन येरावार यांनी फेटाळले आहेत. निमंत्रणाच्या वादावर येरावार यांनी नाव न घेता साहित्य महामंडळाकडे बोट दाखवले. तर संमेनलाच्या उद्‌घाटनाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार नसल्याची माहितीही त्यांनी आज यवतमाळमध्ये दिली.

यवतमाळचे पालकमंत्री आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष असलेले मदन येरावार यांनी आज संमेलनाच्या तयारीचा आढावा घेतला. नयनतारा यांच्या निमंत्रणाच्या वादावरुन अनेक साहित्यिक आणि विचारवंतांनी संमेलनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. अशा सर्वांना येरावार यांनी संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना पाठवलेले निमंत्रण आयोजकांनी रद्द केल्यानंतर साहित्य क्षेत्रात मोठा गदारोळ माजला होता. या वादानंतर साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी बुधवारी महामंडळ उपाध्यक्ष विद्या देवधर यांना ई-मेलने राजीनामा पाठवला होता. हा राजीनामा आज मंजूर करण्यात आला. अशावेळी उपाध्यक्षच महामंडळाचे काम पाहणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)