इंडिगोकडून 12 मे पासून कोल्हापूरात विमानसेवेला सुरूवात

हैदराबाद आणि तिरुपती या उड्डाणांची सेवा

कोल्हापूर – भारतातील सर्वांत मोठ्या हवाई वाहतूक कंपनी इंडिगोने आपली सेवा देण्याचे 69 वे ठिकाण म्हणून कोल्हापूरचे नाव जाहीर केले आहे. आपल्या 13 व्या एटीआर विमानाच्या सहाय्याने इंडिगो दररोज कोल्हापूर ते हैदराबाद आणि कोल्हापूर ते तिरुपती या मार्गांवर सेवा उपलब्ध करून देणार आहे, ज्याची सुरुवात 12 मे 2019ला होणार आहे.त्याचबरोबर रिजनल कनेक्‍टिव्हिटी योजनेअंतर्गत (आरसीएस) अलाहाबाद, हुबळी आणि जोरहाट यांना जोडल्यानंतर इंडिगोच्या वतीने कोल्हापूर हा आरसीएसमधला 4था मार्ग असेल. जे प्रवासी त्यांच्या प्रवासाचे नियोजन करू इच्छितात त्यांना ुुु.सेळपवळसे.ळपवेबसाइटवरून तिकिटे आरक्षित करता येतील.

“कोल्हापूर ही आमच्या दृष्टीने महत्त्वाची बाजारपेठ आहे आणि रिजनल कनेक्‍टिव्हिटी योजनेअंतर्गत (आरसीएस) अलाहाबाद, हुबळी आणि जोरहाट नंतर कोल्हापूर हा चौथा मार्ग आहे. आम्ही आमचे जाळे मजबूत करत आहोत आणि आणखी परवडणारी सेवा, आमच्या ग्राहकांसाठी पॉइंट-टू -पॉइंट कनेक्‍टिव्हिटी देऊ शकू, असा आमचा विश्वास वाटतो आहे.’ असे इंडिगोचे मुख्य कमर्शियल अधिकारी विल्यम बोल्टर म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)