वाई तालुक्‍यात ज्वारी काढणीस सुरुवात

यात्रा हंगाम सुरु होत असल्याने शेतकऱ्यांची धांदल

कवठे – संपूर्ण वाई तालुक्‍यामध्ये आगाप पेरणी झालेल्या ज्वारी काढणीस सुरुवात झाली आहे. शेतकरी राजा शेतीच्या कामात मग्न असल्याचे चित्र सगळीकडे पहावयास मिळत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संपूर्ण तालुक्‍यामध्ये यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने यावर्षी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळी परिस्थिती ओढवली होती. त्यामुळे केंजळ, गुळूंब यासारख्या गावामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी संकट ओढवले असताना शेतीसाठी पाणी देणे हे मुश्‍कील ठरत होते. पाऊस समाधानकारक न झाल्याने ज्वारी व गहू या पिकांना या परिसरातील शेतकऱ्यांना पाणी देता आले नाही. तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात सुरुवातीला होत असलेल्या थुईथुई पावसामुळे आगाप पेरणी झाली असली तरी नंतर पाऊस गायब झाल्याने या परिसरातील पिकांनासुद्धा फटका बसला आहे.

गेल्या आठवडाभरात गायब झालेल्या थंडीचा व कडक होत असलेल्या उन्हाचा परिणाम या पिकांवर होवू लागल्याने आगाप पेर झालेली ज्वारीची पिके काढणीयोग्य झाली आहेत. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी ज्वारी काढणीस सुरुवात केली आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये संपूर्ण वाई तालुक्‍यात यंदा ज्वारी व गहू यांची पेरणी अत्यल्प प्रमाणात झाली असून एकूण झालेल्या पेरणीपैकी पाण्याच्या उपलब्धतेच्या कमतरतेने पिकांच्या उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट झाली असून यंदा या पिकांचे उत्पादन गतवर्षीच्या उत्पादनाच्या तुलनेत कमी झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)