किसान सन्मान निधीचे पैसे जमा होण्यास सुरुवात

जिल्ह्यातील 2 हजार 440 शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात 48 लाख 80 हजार जमा

सातारा – प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा देशभरात शुभारंभ रविवार दि. 24 फेब्रुवारी 2019 रोजी करण्यात आला असून या योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आजपर्यंत सातारा जिल्ह्यातील 2 हजार 440 शेतकऱ्यांच्या 48 लाख 80 हजार रुपये थेट बॅंक खात्यात जमा झाले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या योजनेच्या माध्यमातून 2 हेक्‍टरपेक्षा कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. अल्प व अत्यल्प, भूधारक शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत प्रती शेतकरी कुटुंबाला प्रती वर्ष रुपये 6 हजार अर्थसहाय्य तीन टप्प्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत आजपर्यंत सातारा जिल्ह्यात 2 हजार 440 शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात 48 लाख 80 हजार रुपये थेट बॅंक खात्यात जमा करण्यात आलेले आहे.

सातारा जिल्ह्यात 9 लाख 75 हजार शेतकरी अल्प व अत्यल्प भूधारक आहेत. त्यापैकी आज अखेर 3 लाख 25 हजार शेतकऱ्यांची यादी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत अपलोड करण्यात आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत पहिला हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरु असून पात्र शेतकऱ्यांची नोंद करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. तसेच ज्या पात्र शेतकऱ्यांनी आपली नावे योजनेसाठी दिली नसतील अशा शेतकऱ्यांनी संबंधित तालुक्‍यातील यंत्रणेशी संपर्क साधून आपले नाव समाविष्ट करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)