स्टार्स क्रिकेट क्‍लबच्या जिद्दीचा आदर्ष घावा – डॉ. सुधीर भाटे

पुणे – कोणतेही आर्थिक पाठबळ तसेच स्वताःची वास्तू नसतानाही 50 वर्षांची मजल गाठणे अवघड असते. मात्र, स्टार्स क्रिकेट क्‍लबने हे आव्हान मोठ्या जिद्दीने पार पाडले. या त्यांच्या जिद्दीचा आदर्ष इतरांसाठी प्रेरनादाई आहे असे विचार प्रसिद्ध हृदयशल्यतद्न आणि पीवायसी क्‍लबचे अध्यक्ष डॉ. सुधीर भाटेयांनी स्टार्स क्रिकेट क्‍लबच्या 50व्या वर्धापन दिनाचा केक कापताना व्यक्त केले आहेत.

यावेळी झालेल्या कार्यक्रमात क्‍लबचे संस्थापक सदस्य सर्वश्री चंद्रकांत शेवाळे, अशोक दिक्षीत, बंडू ताम्हणकर, डॉ. प्रफुल्ल खंडेलवाल, भीमा शंकर घंटी तसेच क्‍लबचे माजी रणजीपटू संजय कोंढाळकर, रवि येरवडेकर, नितिन खाणीवाले यांच्यासह क्रीडा समिक्षक प्रकाश पायगुडे, नितिन हार्डिकर, प्रदीप शेटे, सुनिल गाडगीळ, नंदकुमार शेवाळे, पी.डी.सी.एचे अध्यक्ष यशवंत भुजबळ उपस्थित होते.

वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात गेल्या 50 वर्षांमध्ये विशिष्ट कामगिरी करणाऱ्या सदस्यांचा सन्मान यावेळी डॉ. भाटे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यात प्रामुख्याने सर्वश्री गिरीष जोशी, प्रदिप पटवर्धन, वसंत देव, शशांक इनामती, रमण द्रवीड यांचा समावेश होता.

तसेच विद्यमान खेळाडूंपैकी रणजी खेळाडू वृषभ राठोडसह शुभंकर हार्डीकर, वरद खाणिवाले, नचिकेत वेलणकर, जयराज दिवाण, स्वप्निल वाळंज, अभिषेक मोरे, कृष्णा भट, सुरेश दिसलेयांचा सत्कार विशेष अतिथी माधव रानडेयांच्या हस्ते करण्यात आला. तसेच यावेळी क्रिकेट मार्गदर्शक हेमंत किणीकर, इम्तियाज दफेदार, लियाकत मुजावर, नंदु शिवले, भरत मारवाडीयांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रकांत शेवाळे यांनी तर सुनंदन लेलेयांनी सुत्रसंचलन केले तर नितिन हार्डीकरयांनी उपस्थितांचे आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)