स्टेअरिंग लॉक झाल्याने चुकला काळजाचा ठोका

पुणे – पीएमपीच्या मार्गावरील बसचे अचानक स्टेअरिंग लॉक झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. परंतु, त्याने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे बस पदपथाला धडकली. यामुळे मोठा अपघात टळला. दरम्यान, संबंधित बस ठेकेदारांकडून चालवण्यात येणारी असल्याने पुन्हा एकदा कंत्राटी बसेसचा सुरक्षेचा मुद्दा समोर आला आहे.

मंगळवारी दुपारच्या सुमारास आरटीओ कार्यायासमोरील चौकात ही घटना घडली. यानंतर वाहतूक पोलिसांनी या घटनेची माहिती पीएमपी प्रशासनाला दिली. गेल्या महिन्यात वारजे येथे झालेल्या अपघातामध्येही स्टेअरिंग रॉड तुटल्याने चालकाचा ताबा सुटून बसचा अपघात झाला होता. वारजे आणि मंगळवारी घडलेल्या घटनेतील दोन्हीही बस या ठेकेदारांच्याच असल्याचे समोर आले आहे. यामुळे पुन्हा एकदा ठेकेदारांकडून चालवण्यात येणाऱ्या बसेसचा सुरक्षेचा प्रश्‍न समोर आला आहे. सुदैवाने यामध्ये कोणी जखमी झाले नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ठेकेदारांकडून चालवण्यात येणाऱ्या बसेसच्या अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)