स्वस्त साड्यांमुळे मॉलमध्ये चेंगराचेंगरी

हैदराबाद – हैदराबादमधील एका मॉलमध्ये रविवारी (17 फेब्रुवारी) साड्यांचा सेलमध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर महिला पोहोचल्याने चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या साड्यांची किंमत केवळ 10 रुपये असल्याने महिलांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.

शहरातील सिद्धीपेटमध्ये सीएमआर मॉलमध्ये केवळ 10 रुपयांत साडी मिळत असल्याचे समजल्यावर महिला, तरुणींची मोठी गर्दी झाली. गर्दी वाढल्यामुळे स्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने मॉल व्यवस्थापनाने हात टेकले. सेलमधील साडी विकत घेण्यासाठी आलेले अनेक जण जखमी झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एका महिलेने 5 तोळ्याची चेन, 6000 रुपये आणि एक डेबिट कार्ड गमावले आहे. चेंगराचेंगरीच्या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी तेथे धाव घेत तपासास प्रारंभ केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)