पुणे – यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुणे, वसंतदादा सेवा संस्था आणि स्टेडियम क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “स्टेडियम क्रिकेट करंडक अजिंक्यपद’ स्पर्धेच्या 12 आणि 14 वर्षाखालील गटात अनुक्रमे स्टेडियम क्रिकेट क्लब आणि एच.के. बाऊंस ऍकॅडमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा एकतर्फी पराभव करून आगेकूच केली.
स.प. महाविद्यालय मैदानावर झालेल्या 12 वर्षाखालील गटाच्या सामन्यात कुणाल कुंभारच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर स्टेडियम क्रिकेट क्लब अ संघाने ब संघाचा 7 गडी राखून सहज पराभव केला. स्टेडियम ब संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना, अजिंक्य जठार (24 धावा) व अर्णव कसबे (नाबाद 12) धावा यांच्या फलंदाजीच्या जोरावर 20 षटकात 6 गडी 96 धावा जमविल्या. कुणाल कुंभार याने 3 धावात 2 गडी बाद केले. हे आव्हान स्टेडियम क्रिकेट क्लब अ संघाने 14.3 षटकात व 3 गडी गमावून पूर्ण केले. कुणाल कुंभार 12 धावा व हर्षद लांडगे 12 धावा यांनी संघाला सोपा विजय मिळवून दिला.
14 वर्षाखालील गटाच्या सामन्यात स्वराज चव्हाणच्या कामगिरीच्या जोरावर एच.के.बाऊंस ऍकॅडमीने ए.के. स्पोर्टस् मॅनेजमेंट संघाचा 146 धावांनी सहज पराभव केला. एचके संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 25 षटकात 7 गडी 201 धावांचा डोंगर रचला. धैर्यशील माने (नाबाद 44 धावा), यश घारे (31 धावा), अविनाश गायकवाड (29 धावा) आणि स्वराज चव्हाण (17 धावा) यांच्या फलंदाजीमुळे संघाने धावफलकावर व्दिशतक लावले. याला उत्तर देताना ए.के. स्पोर्टस् मॅनेजमेंटचा डाव 17.2 षटकात व 55 धावांवर आटोपला. एचके संघाच्या स्वराज चव्हाण याने 8 धावात 3 गडी बाद केले.
सविस्तर निकालः गटसाखळी फेरी :
12 वर्षाखालील गटः
स्टेडियम क्रिकेट क्लब ब : 20 षटकात 6 गडी बाद 96 धावा (अजिंक्य जठार 24 (23), अर्णव कसबे नाबाद 12, कुणाल कुंभार 2-3) पराभूत वि. स्टेडियम क्रिकेट क्लब अः 14.3 षटकात 3 गडी बाद 98 धावा (कुणाल कुंभार 12, हर्षद लांडगे 12, अवधुत धनकडे 2-10); सामनावीरः कुणाल कुंभार;
14 वर्षाखालील गट : एच.के.बाऊंस ऍकॅडमीः 25 षटकात 7 गडी बाद 201 धावा (धैर्यशील माने नाबाद 44 (53, 4 चौकार), यश घारे 31 (18, 3 चौकार), अविनाश गायकवाड 29 (20, 2 चौकार), स्वराज चव्हाण 17, आदित्य नारळे 2-38, देवांग गरूड 2-42) वि.वि. ए.के. स्पोर्टस् मॅनेजमेंटः 17.2 षटकात 10 गडी बाद 55 धावा (तेजस पाटील 17, रणजीत मलिक 10, स्वराज चव्हाण 3-8); सामनावीरः स्वराज चव्हाण;