एसटी कर्मचाऱ्यांच्या मुला-मुलींना उच्चशिक्षणासाठी दरमहा 750 रुपये शिष्यवृत्ती 

मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांना महामंडळातर्फे बारावीनंतर उच्च शिक्षणासाठी सावित्रीबाई ज्योतिबा फुले शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. शिक्षण संस्थेत उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतल्यानंतर या विद्यार्थ्यांना दरमहा 750 रुपये इतकी रक्कम शैक्षणिक शिष्यवृत्ती म्हणून मिळणार आह. या निर्णयाचा लाभ महामंडळाच्या सुमारे 1 लाख 4 हजार कर्मचाऱ्यांना होणार आहे.
बारावीनंतर केवळ पैशाअभावी एसटी कमर्चाऱ्यांच्या महाविद्यालयीन मुला-मुलींचे उच्चशिक्षण खंडित होऊ नये, या निरपेक्ष उद्देशाने दिवाकर रावते यांनी सावित्रीबाई ज्योतिबा फुले शिष्यवृत्ती योजनेची संकल्पना मांडली. या योजनेअंतर्गत एसटी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना मान्यताप्राप्त विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या शिक्षण संस्थेत उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतल्यानंतर दरमहा 750/- रु इतकी रक्कम शैक्षणिक शिष्यवृत्ती म्हणून मिळणार आहे.
सदर रक्कम संबंधित विद्यार्थ्याच्या राष्ट्रीयकृत/शेड्युल्ड बॅंकेच्या खात्यावर महामंडळातर्फे थेट जमा करण्यात येईल. दरवर्षी कामगार अधिकारी, शिष्यवृत्ती पात्र पाल्यांची नावे मागवतील. त्यांची छाननी करून लाभार्थी पाल्यांच्या बॅंक खात्यावर दरमहा सदर रक्कम जमा करण्यात येईल. प्रत्येक एसटी कर्मचाऱ्यांच्या दोन पाल्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. यासंबंधीचे परिपत्रक नुकतेच महामंडळाच्या कर्मचारी विभागामार्फत निर्गमित करण्यात आले आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)