एेन दिवाळीत एसटीचा प्रवास महागणार

मुंबई – एेन दिवाळीच्या सुट्टीत राज्य परिवहन महामंडळाने सरसकट दहा टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला असून पुढील महिन्यांतील 1 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर या दरम्यान 20 दिवसांसाठी भाडेवाढ लागू करण्यात येणार आहे. यंदा मात्र दरवर्षीप्रमाणे सेवाप्रकार निहाय  10,15 आणि 20 टक्के अशी भाडेवाढ न करता सरसकट 10 टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे.

हंगामानुसार एसटीच्या भाड्यात 30 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा किंवा भाडे कमी करण्याचा अधिकार एसटी महामंडळाला राज्य परिवहन निगमनं दिलाय. त्यामुळे यंदाही दिवाळीसाठी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.  यंदा करण्यात आलेली 10 टक्के भाडेवाढ ही सर्व सेवा प्रकारासाठी केवळ 20 दिवसासाठी करण्यात आली आहे. ही भाडेवाढ 31 आॅक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.

दिवाळीच्या सुट्टीमध्ये गावी जाणाऱ्या प्रवाशांचं प्रमाण मोठं असतं. त्यामुळे एेन दिवाळीत गरीबाचा रथ अशी अोळख असलेल्या लाल एसटीचा प्रवास  महागणार असून सामान्य जनतेला याचा फटका बसणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)