पुणे विभागासाठी एसटीच्या 20 “ब्रेकडाऊन व्हॅन’

पुणे – मार्गावर बंद पडलेली अथवा अपघातग्रस्त एसटी बस जागेवरच दुरुस्त व्हावी, यासाठी अत्याधुनिक आणि सुसज्ज अशा 50 ब्रेकडाऊन व्हॅन महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. प्रवाशांची संख्या आणि महसूल लक्षात घेऊन महामंडळाने पुणे शहर आणि प्रादेशिक विभागासाठी तब्बल 20 ब्रेकडाऊन व्हॅन दिल्या आहेत.

गेल्या काही वर्षांच्या कालावधीत एसटी महामंडळाने मार्गावर बसेस बंद पडण्याचे प्रकार कमी करण्यासाठी आणि त्यामाध्यमातून प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, एखादी बस मार्गावर बंद पडल्यास महामंडळाचे वाहक आणि कर्मचाऱ्यांना प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागते. अशा प्रसंगी महामंडळाच्या जवळच्या आगारातून दुसरी बस पाठवून प्रवाशांना सेवा दिली जाते, त्याशिवाय बिघाड झालेली बस त्याचठिकाणी दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, या जुन्या पद्धतीमुळे अनेकवेळा या बसेस टोचण करुन वर्कशॉपमध्ये आणण्यात येते. त्यामध्ये महामंडळाचे नुकसान होत असून त्यातून काही प्रमाणात आर्थिक ताण वाढला आहे. या प्रकाराची महामंडळाने दखल घेतली असून त्यासाठीच या अत्याधुनिक ब्रेकडाऊन व्हॅन खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रादेशिक पुणे विभागासाठी 10, पुणे शहर-10, औरंगाबाद-11, नागपूर-5, अमरावती-5, रायगड-5 ब्रेकडाऊन व्हॅन देण्यात येणार आहेत. या व्हॅनच्या माध्यमातून अपघातग्रस्त अथवा बिघाड झालेल्या बसची दुरुस्ती जागेवरच करण्यात येणार आहे, या बसेसचा पुरेसा उपयोग झाल्यास महामंडळाच्या वतीने अशा प्रकारच्या आणखी व्हॅन घेण्यात येणार आहेत.

अशी असेल ब्रेकडाऊन व्हॅन…!
– एअर कॉम्प्रेसर आणि टूल बॉक्‍स
– स्पेअर पार्टस रॅक
– चेन पुली ब्लॉक आणि जनरेटर
– नॉमॅटिक गिलीसिरिंग ऍन्ड गन
– जॅक, व्हील टूल, सर्च लाईट
– ड्रिलिंग मशीन, ऑईल पंप
– वॉटर टॅंक आणि अन्य सुविधा

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)