‘एसटी’ महामंडळ करणार 65 अधिकाऱ्यांची भरती

भरती सरळसेवा पद्धतीने होणार : 19 मार्चपर्यंत भरती सुरू राहणार

पुणे – सेवानिवृत्त होणारे अधिकारी, वाढते प्रवासी आणि राज्यभरात वाढणारी डेपोंची संख्या यामुळे प्रवाशांना दर्जेदार सुविधा पुरविताना एसटी महामंडळाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. डेपो आणि प्रवाशांच्या संख्येच्या तुलनेत महामंडळाला तब्बल 500 अधिकाऱ्यांची कमतरता जाणवत आहे. या प्रकाराची महामंडळाच्या मुख्य कार्यालयाने गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात वरिष्ठ स्तरावरील 65 अधिकाऱ्यांची सरळसेवा पद्धतीने भरती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्यानंतर वर्षभराच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने अन्य पदांचीही भरती करण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया 21 फेब्रुवारीपासून सुरू झाली असून ती 19 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या काही वर्षांच्या कालावधीत खासगी बसेसमुळे महामंडळाच्या महसूलात चांगलीच कपात झाली होती. त्याची गंभीर दखल घेऊन महामंडळाने हा महसूल वाढविण्यासाठी आणि प्रवासी आकर्षित करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू केले आहेत. विशेष म्हणजे महामंडळाच्या या प्रयत्नांना अपेक्षेपेक्षाही अधिक यश आले आहे. त्यामुळे महामंडळ आणि अधिकाऱ्यांचाही आत्मविश्‍वास वाढला आहे. मात्र, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अपुरे मनुष्यबळ यामुळे या प्रयत्नांना काही प्रमाणात खिळ बसत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब लक्षात घेऊन महामंडळाने गेल्याच महिन्यात 5 हजार वाहक आणि चालकांची भरती सुरू केली असून ही भरती अंतिम टप्प्यात आहे. त्याशिवाय वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांचीही कमतरता जाणवत असल्याने 65 अधिकाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे, अशी माहिती वाहतूक व्यवस्थापक माधव काळे यांनी “प्रभात’ शी बोलताना दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)