धनगर समाजाला तातडीने “एसटी’चा दाखला द्या

संग्रहित छायाचित्र

पुण्यात मेळावा : राज्यभर करणार आंदोलन

पुणे – आरक्षणापासून वंचित धनगर समाजाने बुधवारपासून आंदोलन सुरू केले आहे. येत्या शंभर दिवसांत “धनगड’ दाखवा अन्यथा “धनगरांना’ एसटी (अनुसूचित जमाती) प्रवर्गाचा दाखला द्यावा, अशी मागणी केल्याची माहिती धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी येथे दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आरक्षणाच्या मागणीसाठी बुधवारी धनगर समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. याला राज्यातून धनगर समाज मोठ्या संख्येने हजर होता. सांगली, बारामती, इंदापूर, सातारा या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यातील धनगर समाजाची एकच मागणी असून “र’ चे “ड’ झालेले आहे, ते देशातील अन्य राज्यांप्रमाणे दुरुस्त करावे. केंद्र सरकारने याबाबत अनकुलता दर्शविली आहे. आता राज्य शासनाने तसाच अहवाल दिला, तर नक्कीच फायदा होणार आहे, असे मत यावेळी व्यक्‍त करण्यात आले.

आमचे आंदोलन हे शांततेच्या मार्गाने करणार आहोत. आम्ही सरकारमध्ये सामील आहोत. त्यामुळे सरकारने आम्हाला चर्चेला बोलविले, तर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. आमच्याकडे पुरावे आहेत. ते सादर केले आहेत. त्यामुळे आता सरकारने त्वरीत याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी पडळकर यांनी केली. शिवाय, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांनी जी खोटी माहिती दिली, त्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीसुद्धा यावेळी करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)