एसटीच्या काचांना आता संरक्षणात्मक जाळी

सुरूवातीच्या टप्प्यात विभागातील 100 बसेसला “प्रोटेक्‍शन’

पुणे – विविध आंदोलनांदरम्यान जाळपोळ, तोडफोडीमुळे अनेक एसटी बसेसचे नुकसान होते. यावर खबरदारीचा उपाय म्हणून संरक्षणासाठी एसटी समोरील काचांना लोखंडी जाळ्या बसवण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्यानुसार पुणे विभागातील काही आगारांमध्ये हे काम सुरू करण्यात आले आहे.

-Ads-

गेल्या काही दिवसांपासून राज्यभरातील विविध आंदोलनांदरम्यान महामंडळाच्या 353 बसेसची तोडफोड करण्यात आली. यामध्ये महामंडळाचे सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर 22 कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे. मागील आठवड्यात चाकण येथे झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने अनेक एसटी बसेसच्या काचा फोडण्यात आल्या, तर काही जाळण्यात आल्या. तसेच वारंवारच्या आंदोलनादरम्यान जमाव एसटी बसेसना “टार्गेट’ करतो. यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने बसचालकासमोरील काचेला संरक्षणात्मक जाळी बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतच्या सूचना सर्व विभागांना देण्यात आल्या आहे. जाळ्या उपलब्ध होतील, त्यानुसार ते बसवण्याचे काम राज्यातील विविध विभागात सुरू आहे.

पुढील काचेला संरक्षणात्मक जाळी का?
अनेकदा चालत्या बसेसवर दगडफेक केली जाते. आंदोलनांमध्ये एसटीच्या पुढील भागाच्या काचा मोठ्या प्रमाणात लक्ष्य केले जातात. यामुळे काच फुटून चालकाचे नियंत्रण सुटण्याची भीती असते. यामुळे प्रवाशांच्याही जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे सुरूवातीला समोरील काचांना जाळ्या बसवण्यात येणार आहेत.

राज्यभरातील एसटीच्या समोरील बाजूस संरक्षणात्मक जाळी बसवण्यात येणार आहे. त्यानुसार पुणे विभागातही हे काम करण्यात येणार आहे. सुरूवातीच्या टप्प्यात विभागातील 100 एसटी बसेसना या जाळ्या बसवण्यात येणार आहेत.
– यामिनी जोशी, विभागीय नियंत्रक, पुणे.

What is your reaction?
1 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)