….एसटी पुन्हा मार्गावर

file photo

पुण्याहून राज्यभरात सुरळीत सेवा

पुणे – आरक्षणासह इतर मागण्यांसाठी राज्यभरात मराठा समाजाकडून आंदोलन सुरू आहे. आंदोलनादरम्यान जमावाने राज्य परिवहन (एसटी) बसेसना टार्गेट केल्याने अनेक बसेसचे नुकसान झाले आहे. तर, काही गाड्या जाळण्यात आल्या. परिणामी गेल्या दहा दिवसांपासून पुणे विभागातून काही मार्गावरील वाहतूक सातत्याने बंद ठेवण्यात येत होती. मात्र, गुरुवारी ही परिस्थिती अटोक्‍यात आल्याने सकाळपासूनच स्वारगेट, शिवाजीनगरहून बस सेवा सुरळीत झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यामुळे गेल्या काही दिवसांपासून विस्कळीत झालेले एसटीचे वेळापत्रक पुन्हा रुळावर आल्याचे चित्र आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मराठा मोर्चेकरांनी आरक्षणाच्या मुद्यावरून आंदोलन केल्याचा फटका गेले दहा-बारा दिवस राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एसटी) बसला. पुण्यातून बाहेरगावी जाणाऱ्या अनेक एसटी रद्द करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली. यामुळे लाखोचे उत्पन्न बुडाले असून प्रवाशांनाही मनस्ताप सहन करावा लागला. सलग तीन दिवसांपासून नाशिक सेवा बंद असल्याने या मार्गावरील प्रवाशांना याचा मोठा फटका बसला. मात्र, गुरुवारी झालेल्या आंदोलनात कुठेही हिंसक वळण न लागल्याने सुरळीतपणे एसटी सेवा सुरू करण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर पुण्यातील शिवाजीनगर स्थानकातून बुधवारी सायंकाळी पाच व औरंगाबादसाठी रात्री आठ वाजल्यापासून सेवा सुरू केल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. एसटी बंद असल्याने अनेक प्रवासी गेले तीन-चार दिवस नाशिक किंवा पुणे येथे अडकून पडले होते. यामुळे त्यांचे प्रचंड हाल झाले. यामुळे सुरळीत एसटी सुरू झाल्याने प्रवाशांनी आनंद व्यक्त केला. दरम्यान, पुण्याच्या तिन्ही आगारातून दादर, बोरिवली, ठाणे येथे जाणाऱ्या शिवनेरींना मात्र गुरुवारी देखील तुरळक प्रवासीच होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)