SSC GD Constable Recruitment 2018 : स्टाफ सिलेक्शन कमीशनकडून उमेदवारांसाठी महत्वाची सूचना

नवी दिल्ली – एसएससी कॉन्स्टेबल जीडी भरती 2018 साठी अर्ज करण्याची प्रक्रिया चालू आहे. एकूण 55,000 जागा आहेत. यादरम्यान स्टाफ सिलेक्शन कमीशनने इच्छुक उमेदवारांसाठी ( ज्यांनी अद्याप अर्ज केला नाही ) एक महत्वाची सूचना जाहिर केली केली आहे.

सूचनेत म्हटले आहे की, ‘अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर आहे, ही मुदत वाढविण्यात येणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी अंतिम तारखेची वाट पाहू नये. शेवटच्या दिवशी संकेतस्थळावर हेवी ट्राफिक असल्याने अर्ज करण्यात अडचणी येतात. त्यामुळे या अडचणीपासून वाचण्यासाठी त्वरीत अर्ज करा’. काही दिवसापूर्वी एसएससीने आॅनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवून 17 सप्टेंबर ऐवजी 30 सप्टेंबर केली होती. अाॅनलाईन फी भरण्याची मुदत देखील 30 सप्टेंबर अशी आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या भरती प्रक्रियेमध्ये इंडियन तिब्बत सीमा पुलिस, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, सीमा सुरक्षा दल, सेंट्रल रिजर्व पुलिस फोर्स, सशस्त्र सीमा दल, स्पेशल सुरक्षा दल, नेशनल इंस्टीविगेशन एजेंसी, असम राइफल सहित इतर फोर्स मध्ये भरती होणार आहे.

दहावी पास विद्यार्थी सुध्दा या जागेसाठी अर्ज करू शकतात. या काॅन्स्टेबल भरतीसाठी कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 23 वर्षे अशी वयोमर्यादा आहे. एससी-एसटी उमेदवारांसाठी वयामध्ये पाच वर्षे तर अोबीसी उमेदवारांसाठी तीन वर्षाची वयोमर्यांदेची सूट आहे.

सर्वसाधारण उमेदवारांसाठी 100 रूपये परीक्षा फी आहे. महिला उमेदवार, एससी,एसटी उमेदवारांसाठी कुठलेही शुल्क नाही. अधिक माहिती ssc.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)