श्रीनगर, जम्मू, लेह विमानतळ बंद

तणावाच्या पार्श्‍वभूमीवर काश्‍मीरातील श्रीनगर, जम्मू, आणि लेह येथील विमान तळ सामान्य विमान वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. एअरपोर्ट ऍथॉरिटीच्या वतीने सांगण्यात आले की सध्याच्या आणिबाणीच्या स्थितीमुळे हे तिन्ही विमानतळ तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहेत.

तथापी या आणिबाणीच्या स्थितीचा तपशील मात्र या ऍथॉरिटीच्यावतीने सांगण्यात आलेला नाही. बडगाम जिल्ह्यात आज सकाळी भारतीय हवाईदलाचे जेट कोसळल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचेही सांगण्यात येत आहे. आज पहाटेपासूनच पाकिस्तानी हद्दीतून भारतीय हद्दीत मोठ्या प्रमाणात तोफगोळे डागण्यात येत आहेत. त्यानंतर भारतीय बाजूकडूनही त्याला प्रत्युत्तर दिले जात आहे. त्या पार्श्‍वभूमीवरही ही दक्षता घेतली जात असावी असे सांगितले जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)