श्रीलंकेच्या पाकिस्तानमधील उच्चायुक्तांच्या घरी चोरी,,,, 

इस्लामाबाद: श्रीलंकेच्या पाकिस्तानमधील उच्चायुक्तांच्या घरी चोरी झाली आहे. या चोरीमुळे अतिमहत्त्वाच्या (व्हीव्हीआयपी) व्यक्तींच्या सुरक्षेतीताल त्रुटी चव्हाट्यावर आल्या असून त्यावर जोरदार टीका होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार काही अज्ञात व्यक्तींनी श्रीलंकेचे पाकिस्तानमधील उच्चायुक्त सोजेना अमरनाथ यांच्या घरात प्रवेश करून मौल्यवान पितळी दिवे आणि बाथरूममधील नळ चोरून नेले. चोरी झालेल्या मालाची किंमत 70,000 रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. श्रीलंकेचे पाकिस्तानमधील उच्चायुक्‍त सोजेना अमरनाथ यांच्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याने उच्चायुक्तांच्या घरी झालेल्या चोरीची तक्रार मरगला पोलीस ठाण्यावर नोंदवली आहे.
उच्चायुक्तांच्या घरावर इतका कडक सुरक्षा बंदोबस्त असूनही चोर इतक्‍या सहजपणे कोणालाही न कळता घरात शिरून चोरी करून सहीसलामत बाहेर कसे गेले हा सुरक्षेच्या विश्‍वसनीयतेच्या दृष्टीने एक प्रश्‍नच आहे.
चोरांना पकडण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांने सांगितले आहे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)