#NZvSL Test : श्रीलंकेचा संघ पराभवाच्या छायेत

ख्राईस्टचर्च – टॉम लॅथम 176 धावा, हेन्री निकोल्स नाबाद 162 आणि कॉलिन डी ग्रॅंडहोम याच्या वादळी 71 धावांच्या जोरावर न्यूझीलंडने श्रीलंके विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीमध्ये तिसऱ्या दिवसअखेर 4 बाद 585 धावांवर आपला दुसरा डाव घोषित केला.

पहिल्या डावातील 74 धावांची आघाडी मिळून न्यूझीलंडने 659 धावांचे लक्ष्य दिले आहे. तर श्रीलंकेने 2 बाद 24 पर्यंतमजल मारली असुन ते अजूनही 636 धावांनी पिछाडीवर आहेत. पहिल्या डावातील त्यांची खराब कामगिरी पाहता त्याचा पराभव या कसोटीत त्याचा पराभव निश्‍चित मानला जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पहिल्या डावात न्यूझीलंडने 178 धावा बनविल्यानंतर श्रीलंकेला 104 धावांत गुंडाळण्यात त्यांना यश आले होते. दुसऱ्या डावात शतकी सलामी मिळाल्यावर आघाडीच्या सर्व फलंदाजांनी चांगल्या खेळी करत न्यूझीलंडला मोठी धावसंख्या उभारून दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)