सनथ जयसुर्यावर मॅच फिक्‍सींगचा आरोप

श्रीलंकेच्या सात खेळाडूंसह दानुष्का गुनतिलके आणि निरोशन डिकवेला यांचा समावेश

कोलंबो – श्रीलंकेचा महान फलंदाज सनथ जयसूर्या मॅच फिक्‍सिंग प्रकरणात दोषी आढळल्याची घटना समोर आली आहे. श्रीलंकेतील एका वेबसाईटने हा दावा केला असून यात जयसूर्यासह श्रीलंकेच्या सात खेळाडूंचा समावेश असल्याचे वृत्त त्यांनी प्रसिद्ध केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या लाचलुचपत विभागाचे सरचिटणीस ऍलेक्‍स मार्शल यांचा सामवेश असलेल्या समितीने या प्रकरणाचा छडा लावला आहे असेही त्या वृत्तात म्हंटले आहे.

-Ads-

श्रीलंका क्रिकेट संघातावर सातत्याने मॅच फिक्‍सिंग व पिच फिक्‍सिंग (सामना निश्‍चिती व खेळपट्टी निश्‍चिती) केल्याचे आरोप होत होते. त्याचा तपास करण्यासाठी आयसीसीचे लाचलुचपत विभाग कामाला लागले होते. त्यांनी या तपासाचा अहवाल नुकताच श्रीलंकेचे पंतप्रधान आणि आयसीसी अध्यक्षांकडे सुपूर्द केला. या गुपित अहवात अल जझीरा चॅनेलचा हाती लागला असून त्यांनी श्रीलंकेच्या दोषी खेळाडूंची नावे जाहीर केली.

या अहवालात दोषी खेळाडूंनी मॅच फिक्‍सिंग केल्याची कबुली दिल्याची टेप आहे. त्यानुसार या खेळाडूंमध्ये माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूज, सचिक्षा सेनानायके, वनिंधू हसरंगा, चतुरंगा डी सिल्वा, दानुष्का गुनतिलके आणि निरोशन डिकवेला यांचा समावेश आहे. जेफ्री डेबारेरा हे पिच फिक्‍सिंगमध्ये दोषी आढळले आहेत.

या खेळाडूंमध्ये सर्वात धक्कादायक नाव समोर आले आहे आणि ते म्हणजे महान फलंदाज सनथ जयसूर्या याचे. तो मॅच फिक्‍सिंग आणि पिच फिक्‍सिंग या दोन्ही प्रकरणात दोषी आढळला आहे. संघातील खाजगी गोष्टींसह खेळपट्टीबाबत फिक्‍सर्सना माहिती पुरवण्याचे काम तो करत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)