फाफ ड्यु प्लेसिसची दुखापतीमुळे श्रीलंका दौऱ्यातून माघार

कोलंबो: दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ ड्यु प्लेसिसला श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात दुखापत झाली असून या दुखापतीमुळे त्याने उर्वरित श्रीलंका दौऱ्यातून माघार घेतली आहे. या दौऱ्यात अजून दोन एकदिवसीय सामने अणि एक टी-20 सामना होणे बाकी आहे.
सध्या दक्षिण दक्षिण अफ्रिकेचा संघ श्रीलंका दौऱ्यावर असून या दौऱ्यातील 5 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेच्या फलंदाजीच्या वेळी 10व्या षटकाच्या वेळी झेल टिपताना कोसळल्यामुळे फाफ ड्यु प्लेसिसला दुखापत झाली आणि पुन्हा तो मैदानावर दाखल होऊ शकला नाही. तसेच या दुखापतीमुळे त्याने आगामी सामन्यांमधून माघार घेतल्याचे आफ्रिकन संघव्यवस्थापनाने जाहीर केले आहे.
फाफला झालेली दुखापत ही गंभीर स्वरूपाची असून त्याचा उजव्या खांद्याचा स्नायू दुखावला गेला आहे. या दुखापतीतून बरे होण्यासाठी त्याला जवळपास सहा आठवड्यांचा कालावधी लागू शकतो असे आफ्रिकन टीमचे व्यवस्थापक, तसेच फिजिओ मोहम्मद मोसाजी यांनी सांगितले. तसेच आगामी तीन सामन्यांसाठी हंगामी कर्णधाराची घोषणा लवकरच केली जाईल, तसेच त्याच्या जागेवर कोणताही बदली खेळाडू मागवला जाणार नाह, असे त्यांनी सांगितले.
तिसऱ्या सामन्याच्या वेळी फाफच्या अनुपस्थितीत दक्षिण अफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज क्‍विन्टन डी कॉकने कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली होती, यावेळी त्याने चांगली कामगीरी करताना दोन यशस्वी डीआरएस रिव्ह्यूही घेतले, ज्यामुळे श्रीलंकेला मोक्‍याच्या क्षणी धक्‍के बसले व आफ्रिकेला सहज विजय मिळवता आला. त्यामुळे आगामी सामन्यांसाठी कर्णधार म्हणून डी कॉकचीच निवड होण्याची शक्‍यता आहे.
याशिवाय हाशिम आमला अथवा एडन मर्क्रम यांना देखील कर्णधारपदासाठी विचारणा होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. यातिल मर्क्रमने फेब्रुवारी महिन्यात फाफच्या अनुपस्थितीत भारताविरुद्धच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे नेतृत्व केले होते. आगामी सामन्यात अतिरिक्‍त फलंदाज म्हणून दौऱ्यावर संघासोबत असलेला हेन्रीच क्‍लासेन याला खेळविण्यात येण्याची शक्‍यता असून मालिकेत खराब कामगिरी केल्याने संघाबाहेर असलेल्या मर्क्रमलाही संघात स्थान मिळण्याची

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)