कोलोंबो – श्रीलंकेमध्ये ईस्टरच्या दिवशी झालेल्य साखळी बॉम्बस्फोटांनंतर लागू करण्यात अलेल्या आणीबाणीची मुदत आज महिन्याभरासाठी वाढवण्यात आली. अध्यक्ष मैत्रिपाला सिरीसेना यांनी विशेष अध्यादेशाद्वारे ही मुदत वाढवली. सार्वजनिक सुरक्षिततेसाठी या आणीबाणीची मुदत वाढवण्यात येत असल्याचे अध्यक्ष्यांच्यावतीने सांगण्यात आले.
आणीबाणीच्या कालावधीमध्ये पोलिस आणि लष्कराला विशेष अधिकार प्राप्त होतात. या अधिकारांनुसार संशयितांना कोणत्याही न्यायालयीन आदेशांशिवाय ताब्यात घेणे, अटक करणे आणि चौकशी करण्याचे अधिकार पोलिस आणि लष्कराला प्राप्त होतात. श्रीलंकेमध्ये 21 एप्रिलरोजी तीन चर्च आणि पंचतारांकित हॉटेलांमध्ये झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटांनंतर 23 मे रोजी आणीबाणी जाहीर करण्यात आली होती.
या बॉम्बस्फोटांची जबाबदारी इस्लामिक स्टेट या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. यानंतर श्रीलंकेमध्ये झालेल्या दंगलींमध्ये एक जण ठार झाला तर मशिदी आणि मालमत्तेचे मोठे नुकसानही झाले आहे. या बॉम्बस्फोटप्रकर्णी पोलिसांनी आतापर्यंत 80 जणांना अटक केली आहे.