श्रीलंकेकडून “रावण 1′ उपग्रहाचे प्रक्षेपण

कोलोंबो, (श्रीलंका): श्रीलंकेने आपल्या पहिल्या अंतराळ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. “रावण-1′ असे या उपग्रहाचे नाव असून दोघ स्थानिक इंजिनिअरनी हा उपग्रह विकसित केला आहे. याच आठवड्यामध्ये “इंटरनॅशनल स्पेस सेंटर’मधून प्रक्षेपित झालेल्या या उपग्रहाबरोबर जपान आणि नेपाळच्या “बर्डस 3′ उपग्रहांचेही प्रक्षेपण करण्यात आले आहे.

“रावण-1′ हा उपग्रह अगदी छोटा म्हणजे 11.3 सेमी बाय 10 सेमी बाय 10 सेमी इतका लहान आहे आणि त्याचे वजन 1.05 किलो इतकेच आहे. सोमवारी श्रीलंकेतील प्रमाणवेळेनुसार दुपारी 3.45 वाजता हा उपग्रह अंतराळात सोडण्यात आला, असे स्थानिक वर्तमानपत्राने म्हटले आहे.

पृथ्वीपसून 400 किलोमीटर उंचीवर हा स्थिर करण्यात आला आहे. जपानच्या अंतराळ संस्थेकडे यावर्षी 18 फेब्रुवारीला आणि त्यानंतर 17 एप्रिलला “इंटरनॅशनल स्पेस सेंटर’कडे हा उपग्रह प्रक्षेपणासाठी देण्यात आला होता. अमेरिकेच्या सायग्नस-1 या अवकाशयानाच्या मदतीने याचे प्रक्षेपण झाले.

थारिण्दु दयारत्ने आणि दुलानी चामिका या अंतराळ विज्ञानाच्या दोघा विद्यार्थ्यांनी हा उपग्रह विकसित केला आहे. हे दोघेही जपानमधील क्‍युशू इन्स्टिट्युट ऑफ टेक्‍नोलॉजीचे विद्यार्थी आहेत. “रावण-1′ उपग्रहाद्वारे श्रीलंका आणि आजूबाजूच्या प्रदेशाची छायाचित्रे घेतली जातील. याशिवाय वातावरणातील बदल आणि हवामानाचे अंदाजही या उपग्रहाद्वारे वर्तवले जाणार आहेत. “रावण-1’चे आयुर्मान अंदाजे दिड वर्षे असेल. पण ते पुढे 5 वर्षांपर्यंत वाढवले जाऊ शकणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)