श्रीलंकेचा दक्षिण आफ्रिकेवर 3 धावांनी विजय 

चौथा एकदिवसीय सामना : 11 एकदिवसीय सामन्यांतील पराभवांनंतर पहिला विजय 
पल्लेकेले: दसुन शनाका, थिसारा परेरा आणि कुशल परेरा यांची धडाकेबाज फलंदाजी आणि सुरंगा लकमलच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर श्रीलंकेने चौथ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 3 धावांनी रोमांचकारी पराभव केला. याबरोबरच श्रीलंकेने मालिकेतील पहिला विजय मिळवतानाच आफ्रिकेविरुद्धच्या सलग 11 पराभवांनंतर पहिल्या विजयाची नोंद केली. केवळ 34 चेंडूंत 4 चौकार व 5 षटकारांसह 65 धावा फटकावणारा दसुन शनाका सामनावीर ठरला.
पावसाच्या व्यत्ययाने उशीरा सुरू करण्यात आल्यामुळे सामना 39 षटकांचाच ठेवण्यात आला होता. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 39 षटकांत 7 बाद 306 धावा करताना दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 307 धावांचे आव्हान ठेवले. मात्र पुन्हा सुरू झालेल्या पावसामुळे आफ्रिकेसमोर 21 षटकांत 191 धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले. मात्र प्रत्युत्तरात फलंदाजी करणाऱ्या आफ्रिकेला निर्धारित 21 षटकांत 9 बाद 187 धावांवर रोखून श्रीलंकेने चित्तथरारक विजयाची नोंद केली.
श्रीलंकेने याआधी आफ्रिकेवरील अखेरचा विजय 2014 मध्ये मिळविला होता.
विजयासाठी 191 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या आफ्रिकेला कर्णधार क्‍विन्टन डी कॉक आणि हाशिम आमला यांनी वेगवान सुरुवात करून दिली. मात्र केवळ 3 षटकांत 31 धावांची सलामी करून दिल्यानंतर डी कॉकला बाद करत श्रीलंकेने आफ्रिकेला पहिला धक्‍का दिला. तसेच हेंड्रिक्‍स देखील केवळ 2 धावा करुन बाद झाला. त्यानंतर आमला आणि जे. पी. ड्युमिनीने 4.5 षटकांत 57 धावांची भागीदारी करत दक्षिण आफ्रिकेला शंभरी पार करून दिली.
दक्षिण आफ्रिकेच्या 108 धावा झाल्या असताना सलामीवीर आमलाला बाद करत अकिला धनंजयने श्रीलंकेला महत्त्वपूर्ण बळी मिळवून दिला. आमलाने केवळ 23 चेंडूंत 6 चौकारांच्या मदतीने 40 धावांची वेगवान खेळी केली. त्यानंतर जायबंदी फाफ ड्यु प्लेसिसच्या जागी संघात संधी मिळालेला हेन्‍रिच क्‍लासेन आणि जे.पी ड्युमिनी केवळ एका धावेच्या अंतराने बाद झाल्याने दक्षिण आफ्रिकेची 5 बाद 129 अशी अवस्था झाली.
यानंतर नियमित अंतराने विकेट्‌स पडत गेल्याने दक्षिण आफ्रिकेला निर्धारित 21 षटकांत केवळ 9 बाद 187 धावांपर्यंतच मजल मारता आली व पावसामुळे व्यत्यय आलेल्या या लढतीत यजमान श्रीलंकेने डकवर्थ लुईस प्रणालीनुसार अवघ्या 3 धावांनी थरारक विजय मिळवला. श्रीलंकेच्या सुरंगा लकमलने महत्त्वाच्या क्षणी 3 गडी बाद करताना भेदक गोलंदाजीचे प्रदर्शन केले. तर थिसारा परेराने 32 धावांत 2 गडी बाद करत त्याला सुरेख साथ दिली.
तत्पूर्वी नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेला सलामीवीर निरोशन डिकवेला आणि उपुल थरंगा यांनी अकरा षटकांत 61 धावांची सलामी देताना करुन देत आश्‍वासक सुरूवात करून दिली. ड्युमिनीने डिकवेलाला बाद करत आफ्रिकेला पहिला बळी मिळवून दिला. यानंतर कुशल परेरा (51) थिसारा परेरा (51) आणि दसुन शनाका (65) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर श्रीलंकेला निर्धारित 39 षटकांत 306 धावांपर्यंत मजल मारता आली. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडी आणि जे. पी. ड्युमिनी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक-
श्रीलंका- 39 षटकांत 7 बाद 306 (दसुन शनाका 65, कुशल परेरा 51 थिसारा परेरा 51, थरंगा 36, डिकवेला 34, ड्युमिनी 35-2, एन्गिडी 65-2) वि.वि. दक्षिण आफ्रिका (सुधारित लक्ष्य 21 षटकांत 191 धावा)- 21 षटकांत 9 बाद 187 (हाशिम आमला 40, जेपी ड्युमिनी 38, डी कॉक 23, मिलर 21, लकमल 46-3, परेरा 32-2)

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)