सर्वोच्च न्यायालयाचा निकाल संजिवनी देणारा – श्रीसंथ

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय म्हणजे माझ्या क्रिकेट कारकिर्दीसाठी मिळालेली संजिवनी आहे, असे मत श्रीसंथने व्यक्त केले आहे. आयपीएल स्पॉट फिक्‍सिंग प्रकरणी दोषी आढळल्यानंतर श्रीसंथवर बीसीसीआयने आजीवन बंदी घातली होती. मात्र आता या आजीवन बंदीच्या शिक्षेबाबत बीसीसीआयने पुनर्विचार करावा आणि 3 महिन्यांच्या आत याबाबतचा निकाल द्यावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे मला मिळालेली एक लाईफलाईन आहे. या निर्णयामुळे मला आशेचा किरण दिसला आहे. 90 दिवस म्हणजेच 3 महिन्यांच्या कालावधीत माझ्यावरील बंदी हटवण्याच्या निर्णयावर विचार होईल. पण तोपर्यंत न थांबता मी आतापासूनच क्रिकेटच्या नेट्‌समध्ये सराव करण्यास सुरुवात केली आहे. लवकरच मी क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करेन, असा विश्वास श्रीसंथने व्यक्त केला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)