श्रीदेवींच्या एका साडीवर लाखांची बोली!

मुंबई : बॉलिवूड सेलिब्रिटीज, राजकारणी, उद्योगपती अशा बड्या हस्तींनी वापरलेल्या वस्तू विकत घेण्यामध्ये अनेकांना रुची असते. सेलिब्रिटीजने वापरलेल्या वस्तू विकत घेण्याची क्रेझ असल्यानेच अनेक जण अशा वस्तू त्यांच्या मूळ किमतीच्या कितीतरी पटीने अधिक किंमत मोजून विकत घेताना दिसतात. सध्या इंटरनेटवर असाच एक लिलाव सुरु असून याद्वारे दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या साड्यांसाठी बोली लावली जात आहे.

बॉलिवूडमध्ये फॅशन आयकॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री ‘श्रीदेवी’ यांच्या मृत्यूला येत्या २४ फेब्रुवारीला एक वर्ष पूर्ण होत असून त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्ताने कपूर परिवारातर्फे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. गेल्या आठवड्यामध्ये १४ फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे कपूर कुटुंबियांमार्फत श्रीदेवी यांच्या आठवणींमध्ये एक पूजा देखील आयोजित करण्यात आली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान श्रीदेवी यांच्या पहिल्याच स्मृतिदिनानिमित्त कपूर कुटूंबियांमार्फत श्रीदेवींच्या साड्यांचा ऑनलाईन लिलाव आयोजित करण्यात आला आहे. या लिलावास चांगला प्रतिसाद मिळत असून ४० हजार रुपयांपासून सुरु करण्यात आलेल्या “कोटा साडी”वर आतापर्यंत १ लाख २५ हजारांची बोली लागली आहे.

लिलावातून मिळणारी संपूर्ण रक्कम कपूर कुटुंबियांकडून निराधार महिला,अनाथ मुले आणि वृद्धांसाठी काम करणाऱ्या ‘कन्सर्न इंडिया’ फाउंडेशन प्रोग्राम संस्थेला देण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)