नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघ ३ ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या विंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात २ कसोटी सामने, ३ वनडे सामने आणि ३ टी ट्वेंटी सामने खेळण्यात येणार आहेत. वनडे, टी २० संघातील खेळाडुंची नावे जाहीर करण्यात आली. बीसीसीआयने घेतलेल्या पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहीती देण्यात आली. या दौऱ्यात महेंद्रसिंग धोनी खेळणार नसल्याचे सांगण्यात आले.
त्यानुसार कसोटी, एकदिवसीय आणि टी ट्वेंटी सामन्यासाठी विराट कोहली कर्णधारपदी कायम असून एकदिवसीय आणि टी ट्वेंटी सामन्याच्या उपकर्णधारपदी रोहित शर्मा कायम आहे. तर कसोटीच्या उपकर्णधारपदी अजिंक्य रहाणेची निवड करण्यात आली आहे.
धोनीने आपण पुढील दोन महिने उपलब्ध नसल्याचे बीसीसीआयला कळविले आहे. त्यामुळे या दौऱ्यात त्याचा समावेश नसेल. कसोटीत त्याच्या जागी ऋषभ पंतसह वृद्धिमान साहा यष्टीरक्षणाची धुरा सांभाळेल.
MSK Prasad,BCCI on MS Dhoni not a part the squad for WI tour:He's unavailable for this series but we had certain roadmaps&plans till WC.Subsequently, we've laid down few more plans&thought of giving as many opportunities to Pant & to see he is groomed. This is our plan right now pic.twitter.com/9FG67ogUVr
— ANI (@ANI) July 21, 2019
टी २० सामन्यासाठीचा संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप कर्णधार), धवन, के.एल.राहुल, श्रेयश अय्यर, मनिष पांड्ये, रिषभ पंत ( विकेट किपर), कृणाल पांड्या, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, दीपक चहर, नवदिप सैनी
वन डे मालिकेसाठी संघ :
विराट कोहली ( कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के.एल. राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद, भुवनेश्वर कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद
कसोटी मालिकेसाठी संघ :
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयांक अग्रवाल, के.एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, उमेश यादव,इशांत शर्मा