पुणे – वेस्ट इंडिजचा स्टार खेळाडू कियरॉन पोलार्ड हा सध्या त्याच्या कारकिर्दीतील उतरत्या काळात असून सध्या तो चांगली कामगिरी करु शकत नसल्याने जगभरातील त्याचा लौकीक कमी होत असून जर त्याला पुन्हा एकदा आपला लौकीक मिळवायचा असेल तर त्याला आपला फॉर्म पुन्हा मिळवणे आवश्यक आहे.
पोलार्ड 2010 मध्ये प्रथम प्रकाश झोतात आला. त्याला इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधील मुंबई इंडियन्सने 7 लाख 50 हजार अमेरिकन डॉलर इतकी मोठी रक्कम मोजून करारबद्ध करून घेतले. त्यावेळी त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द नुकतीच चालू झाली होती. त्याने 15 एकदिवसीय सामन्यात 11. 30 च्या सरासरीने तर 10 टी – 20 सामन्यात 17. 20 च्या सरासरीने धावा जमविल्या होत्या.
मुंबई इंडियन्सने पोलार्डसारख्या एखाद्या नवोदित खेळाडूला मोसमातील सर्वाधिक रक्कम देऊन करारबद्ध केले तेव्हा त्यांनी त्या खेळडूतील प्रतिभा आणि त्याचे एकहाती सामना फिरवण्याचे कसब पहिले होते. त्यावर विश्वास ठेवला होत्रा. तो विश्वास त्याने पहिले काही वर्षे सार्थ ठरविला. परंतु, मागील काही मोसमात त्याची कामगिरी खालावली असून गेल्या मोसमात त्याला एकही मोठी खेळी करता आली नव्हती. त्यातच त्याचे राष्ट्रिय संघातील भविष्य देखील टांगणीवर आहे. त्याच्या खराब कामगिरी मुळे सध्या तो मुंबई इंडियन्सच्या संघतून देखिल आत – बाहेर होत आहे. त्यामुळे जर त्याला आगामी मोसमात पुन्हा मुंबई किंवा आयपीएलसारख्या क्रिकेट लीगमधून खेळावयाचे असेल तर त्याला आपल्या लौकिका प्रमाणे कामगिरी करावी लागणार आहे.
मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यात फाटके मारण्याची क्षमता आणि गोलंदाजीतील चतुराई या दोन मुख्या कौशल्यांमुळे पोलार्ड टी-20 मध्ये लोकप्रिय झाला होता. मागील काही वर्षात आपल्या कामगिरीच्या बळावर तो मुंबई इंडियन्स, ऍडलेड स्ट्रायकर्स, केप कोब्राज, सोमरसेट, कराची किंग्स आणि बार्बाडोस ट्रायडेन्टस यांच्या सारख्या मोठ्या संघांचा महत्वाचा खेळाडू बनला होता. परंतु, मागील 18 महिन्यात त्याने खूपच निराशाजनक कामगिरी केली आहे. त्यातच गत मोसमात तो मुंबई इंडियन्स मधील आपले स्थान गमावून बसला होता. बिग बॉश लीगमध्ये तो खेळला नाही, दक्षिण आफ्रिकेतील नवीन एम झानसी सुपर लीग मध्ये महत्वाचा खेळाडू असूनही त्याला डावलले गेले होते.
सध्या तो बांगलादेश प्रीमियर लीग (बीपीएल) वगळता केवळ कॅरेबिअन प्रीमियर लीगमध्ये आपले स्थान अढळ ठेऊ शकला आहे. वेस्ट इंडिजच्या राष्ट्रीय टी – 20 संघात त्याचे स्थान सध्या तरी पक्के आहे. वेस्ट इंडिजच्या संघात नवोदीत खेळाडूंचा भडीमार आहे. त्यामुळे संघातील सर्वाधिक अनुभवी खेळाडू म्हणून पोलार्डवर कामगिरी उंचावून संघातील खेळाडूंसमोर आदर्श ठेवण्याची गरज होती. परंतु त्यात तो कमी पडला. 2017 पासून त्याने देशाच्या टी-20 संघाचे प्रतिनिधित्व करताना भारत, पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्या विरुद्ध सामने खेळले आहेत. त्याने खेळलेल्या 8 सामन्यात मधल्याफळीतील फलंदाज म्हणून चांगली कामगिरी करू शकला नाही. या सामन्यात त्याचा सर्वाधिक धावा या फक्त 14 अशा होत्या.
वेस्ट इंडिजचे प्रशिक्षक स्टुअर्ट लॉ यांचा पोलार्डला पाठिंबा आहे. पोलार्डची कामगिरी ते आकडेवारीत तोलत नाहीत तर संघातील नवोदित खेळाडूंसाठी तो मेंटॉर म्हणून देखील काम करतो असे सांगतात. भारताविरुद्धच्या लखनौमध्ये झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात विंडीजला 71 धावांनी पराभूत व्हावे लागले होते. या सामन्यानंतर झाल्या पत्रकार परिषदेत लॉ म्हणाले, पोलार्ड मैदानावर आतापर्यंतच्या कामगिरीच्या बलावर नसून संघातील नवोदीत खेळाडूंसमोर एक अनुभवी आणि आदर्श खेळाडू म्हणुन तो संघात आहे.
ड्वेन ब्रावो याने अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर पोलार्ड हाच विंडीज संघातील सर्वाधिक अनुभवी खेळाडू आहे. त्याने 2013 मध्ये झिम्बाब्वे विरुद्धच्या टी – 20 सामन्यात 24 चेंडूत 45 धावांची विजयी खेळी साकारली होती. त्यानंतर तो अशी कामगिरी आतापर्यंत करू शकला नाही. तरी देखील विंडीजने प्रशिक्षक त्याच्यावर विश्वास ठेऊन आहेत. त्यांना वाटते की, तो एक चांगली खेळी करून पुन्हा लईत येईल. परंतु, ते देखील पोलार्डचा सर्वोत्तम खेळ कसा बाहेर येईल? हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा