पहिल्या तीन सामन्यानंतर आमच्यातील ऊर्जा संपली होती : स्टुअर्ट लॉ

थिरुवनंतपूरम – वेस्ट इंडिज संघाचे प्राशिक्षक स्टुअर्ट लॉ यांनी भारत आणि विंण्डीज दरम्यान झालेल्या एकदिवसीय मालिकेतील अंतीम सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत संघाच्या पराभवाची कारणमिमांसा करताना सांगितले की, आम्ही सुरुवातीच्या तीन सामन्यांमध्ये सर्वस्व पनाला लावून खेळलो मात्र तीन सामन्यांनंतर आमच्यातील विजय मिळवण्याची उर्जा जणू संपून गेली होती असा आमचा खेळ झाला.

यावेळी पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, आमच्यासाठी या एकदिवसीय मालिकेतून मिळालेली देणगी म्हणजे आमचे तरुण खेळाडू आणि त्यांनी संघासाठी केलेली कामगिरी. त्यांना या स्पर्धेतून खुप काही शिकायला मिळाले असेही त्यांनी यावेळी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले, माझ्या संघातील खेळाडूंकडे खूप कौशल्य आहे.

परंतु, दबावाखाली निर्णय घेण्याची क्षमता आणि स्थैर्य तुमच्यात असायला हवे.मात्र त्यांच्यात असलेल्या अनुभवाच्या कमतरते मुळे त्यांना या गोष्टीचा दबाव आला आणि त्यांच्यातील विजय मिलवण्याची उर्जा जणू संपुन गेली. जेव्हा तुम्ही भारताविरुद्ध खेळता तेव्हा 40 हजार प्रेक्षक तेथे त्यांच्या संघाला पाठींबा देण्यासाठी येत असतात. त्याच्याशी तुम्हाला जुळवून घेता आले पाहिजे तो दबाव तुम्हाला व्यवस्थीत हताळता आला पाहिजे. असेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी लॉयांनी भारतीय संघाचे आणि खेळाडूंचे कौतुक केले. ते यावेली म्हणाले की, माझे खेळाडू या दौऱ्यात प्रत्येक क्षणी नवीन काहीतरी शिकत होते. सध्या भारतापेक्षा दुसरा कोणताही चांगला संघ नाही. विराट कोहली आणि रोहित शर्मा पेक्षा सरस फलंदाज सध्याच्या घडीला कोणिही नाही. बुमराहने या दौऱ्यात पुनरागमन केल्यानंतर चांगली कामगिरी केली आहे. रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव हे विरोधी फलंदाजांच्या मनाशी चांगले खेळतात असेही ते म्हणाले.

वेस्ट इंडीजच्या संघासाठी बोलताना ते म्हणाले, शाई होप आणि शेमरॉन हेतमायर यांनी चांगले प्रदर्शन केले आहे. त्याचबरोबर जेसन होल्डर याने तो उत्तम अष्टपैलू खेळाडू असल्याचे या मालिकेतून सिद्ध केले आहे. ओशियाने थॉमस याने त्याच्याजवळील गती दाखवून दिली आहे. पुणे आणि हैदराबादमध्ये आम्ही खूप चांगले प्रदर्शन केले. मात्र, अखेरच्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघ आमच्यापेक्षा सरस ठरला आणि आम्ही मालिका गमावली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)