…तर ‘विराट कोहली’च्या नावावर होईल एक खास विक्रम

नवी दिल्ली – भारत वि.वेस्टइंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना आज होणार आहे. या सामन्यात कोहलीला आपल्या नावावर एक खास विक्रम करण्याची संधी आहे. तर या विक्रमाची त्याचे चाहते सुध्दा वाट पाहत आहेत.

खर तर आज विराट कोहली याने आजच्या सामन्यात शतक केलं तर तो दोन देशांच्या एकदिवसीय मालिकेत चार शतक करणारा एकमेव फलंदाज ठरू शकतो आणि असा विक्रम करणारा पहिला फलंदाजही. असा विक्रम अद्याप कोणत्याही फलंदाजाच्या आपल्या नावावर केला नाही.

दरम्यान एकदिवसीय क्रिकेट मध्ये एक खास विक्रम आहे. तो विक्रम म्हणजे दोन देशांच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत तीन शतकं ठोकण्याचा. क्रिकेट जगतातील एकूण  22 खेळाडूंच्या नावे हा विक्रम आहे. ग्रीम हिक, सौरव गांगुली, वीवीएस लक्ष्मण, मैथ्यू हेडेन, डेविड गॉवर, क्रिस गेल, मार्क वॉ (दो वेळा), क्रिस गेल, कुमार संगकारा, केविन पीटरसन, विराट कोहली (दो वेळा), सईद अनवर, मोहम्मद हफीज, इंजमाम-उल-हक, फेफ डु प्लेसिस, एबी डि विलियर्स, जहीर अब्बास, डेसमंड हैंस, क्विंटन डि कॉक, बाबर आजम यांच्या नावावर हा विक्रम आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)