एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत विराट, बुमराह अव्वल

दुबई – आयसीसीने नुकतीच एकदिवसीय क्रिकेटची क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये फलंदाजांच्या क्रमावारीत भारतीय खेळडूंचा दबदबा असून फलंदाजांच्या यादीत तब्बल तीन भारतीय फलंदाज पहिल्या दहा मध्ये आहेत. त्यात कर्णधार विराट कोहली अव्वल स्थानावर विराजमान आहे.

कोहलीने आशिया चषक स्पर्धेत विश्रांती घेतली होती. तरीही त्याने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. तर, या क्रमवारीत भारताचा उपकर्णधार सलामीवीर रोहित शर्मा 871 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तसेच, या यादीमध्ये भारताचा डावखुरा सलामीवीर शिखर धवननेही आठवे स्थान पटकावले आहे. त्यामुळे फलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय खेळाडूंचा दबदबा असल्याचे दिसून येते आहे.

-Ads-

तर, भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी 20 व्या स्थानी आहे. तसेच, सर्वोत्तम गोलंदाजांच्या यादीत जसप्रीत बुमराह 841 गुण मिळवून पहिल्या स्थानावर आहे. याशिवाय, कुलदीप यादव व यजुवेंद्र चहल यांनाही पहिल्या दहामध्ये स्थान मिळालं आहे.

कुलदीपनं तिसरा क्रमांक कायम राखला असून चहलने आठवरून थेट पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. त्यामुळे फलंदाजांबरोबरच गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या दहा खेळाडूंमध्ये तीन भारतीय गोलम्दाज आहेत. तर, सर्वोत्तम संघांच्या क्रमवारीत भारत दुसऱ्या स्थानी असून पहिल्या स्थानावर इंग्लंडचा संघ विराजमान आहे. यावेळी भारतीय संघाचे 121 गुण आहेत. तर, इंग्लंडच्या संघाचे 126 गुण आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)