भारत ‘अ’ संघासाठी पाचव्या क्रमांकावर खेळण्याचा फायदा झाला -शंकर

नवी दिल्ली – मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या बांग्लादेश विरुद्धच्या टी- 20 सामन्यांमध्ये शंकर चमक दाखवू शकला नव्हता. त्यानंतर त्याने चांगली कामगिरी करत भारत अ संघात स्थान मिळवले आणि पुन्हा भारताच्या राष्ट्रीय संघात जागा मिळवली.

याबाबत बोलताना तो म्हणाला, न्यूझीलंड अ संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे. मी माझ्या खेळाचा बारकाईने अभ्यास केला आसून माझी बलस्थाने आणि उणिवा यांची मला पूर्ण कल्पना आहे. राहुल द्रविड यांनी मला सांगितले होते की, त्यांना माझ्या सामना संपविण्याच्या क्षमतांवर विश्वास आहे. त्यामुळे त्याने मला पाचव्या क्रमांकावर खेळवण्यास सुरुवात केली. त्यानंतर माझ्या कामगिरीत सुधारणा झाली.पाचव्या क्रमांकावर फलंदाजी माझ्या शैलीला मदत करणारी ठरली. त्या मालिकेत मी काही नाबाद खेळी केल्या. 300 धावांचा पाठलाग करताना खेळलेली 87 धावांची खेळीही खूप महत्त्वाची होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फलंदाजी बरोबरच गोलंदाजीतही सक्षम असल्याचे सांगताना शंकर पुढे बोलताना तो म्हणाला, मी खेळाच्या दोन्ही विभागात संघाला मदत कारू शकतो. विजय हजारे चषकाच्या काही सामन्यांमध्ये मी पूर्ण 10 षटके गोलंदाजी करताना काही महत्त्वाचे बळी मिळवत संघाच्या विजयात वाटा उचलला होता. त्याचबरोबर मी यंदाच्या रणजी मोसमात खूप गोलंदाजी केली आहे. त्यामुळे मी मानसिकरित्या तयार आहे आणि खडतर परिश्रम केल्याची मला जाणीव आहे.

विश्‍वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळवण्याचा विचार करत नसून मिळालेल्या संधीमध्ये चांगली एकामगिरी करण्यावर माझा भर आहे. त्या गोष्टीचा विचार करत राहिलो तर माझ्यावर अतिरिक्त दडपण येईल आणि त्यामुळे मला माझा खेळ करता येणार नाही असेही तो यावेळी म्हणाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)