‘या’ भारतीय क्रिकेटपटूच्या खराब वर्तनामुळे 20 मिनिटं थाबंवावा लागला सामना

नवी दिल्ली – भारतीय संघातून सध्या बाहेर असलेल्या नमन अोझा यांच्या मैदानावरील खराब वर्तणुकीमुळे सामना 20 मिनिंट थांबविण्यात आला, तरीदेखील दिल्लीने गुरूवारी विजय हजारे ट्राफीमधील ग्रुप बी सामन्यात मध्यप्रदेश संघाचा 75 धावांनी पराभव केला आहे.

सामन्यावर  वाईट प्रभाव टाकणारी घटना सामन्यातील डावाच्या 28 व्या षटकांत झाली. डावखुरा फलंदाज नितीश राणा त्यावेळी 26 धावांवर खेळत होता. त्याने फिरकीपटू रमीज खान याच्या चेंडूवर स्वीप शाॅट खेळला आणि  स्क्वेअर लेगवरील क्षेत्ररक्षकाने हा झेल घेतला. मध्यप्रदेस संघातील खेळाडूंनी आनंद साजरा करण्यास सुरूवात केली मात्र फलंदाज राणा खेळपट्टीवर उभा होता. सामन्यातील अंपायर राजीव गोदारा यानंतर स्क्वेअर लेगचे अंपायर नवदीप सिंह याच्यांकडे गेले आणि चर्चेनंतर तिसऱ्या अंपायरने रैफरल मागितला.

-Ads-

रैफरलनंतर सामन्याचे रैफरी नितिन गोयल यांनी राणा याला नाॅटआउट घोषित केले. त्यानंतर (एक कसोटी, एक एकदिवसीय आणि दोन टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा) नमन अोझा संतापला. त्याने गोदारा याच्यांकडे बोट दाखवत रागाने प्रथम श्रेणीतील त्यांच्या अंपायरीग क्षमतेवर प्रश्न उपस्थित केला. यानंतर सामन्याचे रैफरी गोयल यांना मैदानावर यावे लागले. कारण जवळजवळ 20 मिनिटे खेळ थांबला होता. त्यानंतर सामना सुरू करण्यात आला.

यानंतर राणाने आपले शतक पूर्ण केले आणि ध्रुव शोरे (67) याच्यासोबत तिसऱ्या विकेटसाठी 147 धावांची भागीदारी केली. अोझा याला खेळाच्या प्रतिष्ठेला नुकसान पोहचविल्याबदल कठोर शिक्षा होऊ शकते, कारण सामन्याचे रैफरी गोयल हे  या प्रकरणी सविस्तर अहवाल देऊ शकतात.

What is your reaction?
1 :thumbsup:
1 :heart:
1 :joy:
1 :heart_eyes:
1 :blush:
1 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)