#SLvENG Test : ‘इंग्लंड-श्रीलंका’ कसोटी सामना रोमांचक अवस्‍थेत

इंग्लंडला विजयासाठी 3 बळीची तर श्रीलंकेला 75 धावांची आवश्यकता

कँन्डी – श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी क्रिकेट मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दुसऱ्या डावात इंग्लंडचा संघ 346 धावांवर आटोपला. त्यामुळे श्रीलंकेला विजयासाठी 301 धावांचे आव्हान मिळाले.

इंग्लंडने चौथ्या दिवशी 9 बाद 324 वरून पुढे खेळताना धावसंख्येत 22 धावांची भर टाकली. विजयासाठी 301 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाने दुसऱ्या डावात चौथ्या दिवसअखेर 7 बाद 226 धावा केल्या आहेत. विजयासाठी श्रीलंकेला आणखी 75 धावांची गरज आहे तर इंग्लंड विजयासाठी श्रीलंकेचे तीन गडी बाद करणे गरजेचे आहे.

चौथ्या दिवसाचा खेल संपला तेव्हा खेळपट्टीवर निरोशन डिकवेला हा 27 धावांवर नाबाद होता. तर अकिला धनंजया हा आठवा खेळाडू म्हणून मैदानावर फलंदाजीसाठी नुकताच आला होता. इंग्लंडकडून जैक लीच याने 4 तर मोईन अलीने 2 गडी बाद केले आहेत.

इंग्लंडने या मालिकेतील पहिला सामना जिंकला अाहे. त्यामुळे दुसरा सामना जिंकून तीन सामन्याच्या मालिकेत 2-0 ने आघाडी घेऊन मालिका आपल्या नावावर करण्याचा इंग्लंड संघाचा प्रयत्न असणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)