काहीर वारिक, फैज नस्याम, सिद्धार्थ जडली,आर्यन हूड यांची आगेकूच

काहीर वारिक विरुद्ध आर्यन कुरेशी सामन्यातील एक क्षण.

अखिल भारतीय सुपर सिरीज टेनिस स्पर्धा

पाचगणी  – फैज नस्याम, सिद्धार्थ जडली, काहीर वारिक, प्रणव गाडगीळ, आर्यन हूड या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करताना रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए योनेक्‍स सनराईज रवाईन हॉटेल 16 वर्षाखालील अखिल भारतीय सुपर सिरीज्‌ टेनिस स्पर्धेत पात्रता फेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

-Ads-

पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे शनिवारपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत 16 वर्षाखालील मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या फैज नस्यामने आपला अंकित बथेजाचा 9-0 असा एकतर्फी पराभव केला. गुजरातच्या मन कोडवानीने महाराष्ट्राच्या अथर्व बिराजदारचा 9-6 असा पराभव केला. काहीर वारिक याने आर्यन कुरेशीवर 9-6असा विजय मिळवला. प्रणव गाडगीळने सिद्धांत देसाईला 9-1 असे नमविले.

मुलींच्या गटात सानिया मोरेने चिन्मयी बागवेचा 6-4, 2-6, 6-4 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव केला. तर वेदा मधुसूदनने हिर किंगरवर टायब्रेकमध्ये 7-6(5), 6-2असा विजय मिळवला.

सविस्तर निकाल:

16वर्षाखालील मुले: दुसरी पात्रता फेरी:

फैज नस्याम (महा) वि.वि. अंकित बथेजा (महा) 9-0; मन कोडवानी (गुजरात) वि.वि. अथर्व बिराजदार (महा)9-6; सिद्धार्थ जडली वि.वि. जय गाला (महा) 9-1; ओजस दबस (महा) वि.वि. सार्थ बनसोडे (महा) 9-6; काहीर वारिक (महा) वि.वि. आर्यन कुरेशी (महा) 9-6; हेत ठाकेर (गुजरात) वि.वि. श्रेयश कुमार (महा) 9-4; प्रणव गाडगीळ (महा) वि.वि. सिद्धांत देसाई (महा) 9-1; ईशान गोदभरले (महा) वि.वि. शंतनू गुरव (महा) 9-2; अर्जुन क्रिष्णन (कर्नाटक) वि.वि. पार्थ सुम्बरे (महा) 9-2; लोहित रेड्डी (तेलंगणा) वि.वि. यश पोळ 9-1; यश कोठारी (महा) वि.वि. अर्जुन अभ्यंकर (महा) 9-5;
आर्यन हूड (महा) वि.वि. आर्यन कोटस्थाने (महा) 9-3;

16वर्षाखालील मुली – दुसरी पात्रता फेरी –

व्योमा भास्कर वि.वि. शैशा कारेकर 6-2, 7-5; सानिया मोरे (महा) वि.वि.चिन्मयी बागवे (महा) 6-4, 2-6, 6-4; वेदा मधुसूदन(महा) वि.वि.हिर किंगर (महा) 7-6 (5), 6-2; कनिष्का श्री सी (कर्नाटक) वि.वि. जिया परेरा (महा) 6-4, 6-0; रुमा गायकैवारी (महा) वि.वि. कश्‍मिरा सुम्बरे (महा) 6-1, 6-1.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)