अर्णव पापरकर, राघव अमीन, केयूर म्हेत्रे, उर्वी काटे यांची आगेकूच

एमएसएलटीए योनेक्‍स सुपर सिरीज्‌ टेनिस स्पर्धा

पाचगणी  – मुलांच्या गटात अर्णव पापरकर, राघव अमीन, केयूर म्हेत्रे यांनी, तर मुलींच्या गटात उर्वी काटे, आस्मि आडकर या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करताना येथे सुरु असलेल्या रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए योनेक्‍स सनराईज रवाईन हॉटेल 12 वर्षाखालील सुपर सिरीज्‌ टेनिस स्पर्धेत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.

-Ads-

पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत मुलांच्या गटात दुसऱ्या मानांकित महाराष्ट्राच्या अर्णव पापरकरने तेलंगणाच्या अर्णव बिशोईचे आव्हान 6-3, 6-3 असे मोडीत काढले. केयूर म्हेत्रेने अमोद सबनीसचा 6-4, 4-6, 6-4असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव केला. चौथ्या मानांकित कर्नाटकच्या क्रिश त्यागीने महाराष्ट्राच्या आरव मिश्राचा टायब्रेकमध्ये 6-1, 7-6(3)असा पराभव करून आगेकूच केली.

मुलींच्या गटात सहाव्या मानांकित महाराष्ट्राच्या उर्वी काटेने आपलीच राज्य सहकारी ऐश्वर्या जाधवला 6-3, 6-3असे पराभूत केले. पाचव्या मानांकित महाराष्ट्राच्या आस्मि आडकर हिने तेलंगणाच्या श्रीमान्या अनुगोंडा रेड्डीचा 6-0, 6-1असा एकतर्फी पराभव केला. स्पर्धेचे उदघाटन अभिनेता विद्युत जमवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक जावेद सुनेसरा, एआयटीए सुपरवायझर वैशाली शेकटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

सविस्तर निकाल :

पहिली फेरी : 12 वर्षांखालील मुले – महालिंगम खांडवेल (तामिळनाडू) (1) वि.वि. चिनार देशपांडे (महा) 6-4, 6-4, अक्षज सुब्रमनियन (महा) वि.वि. ह्रिषिक वावीलापल्ली (तेलंगणा) 6-3, 6-0, केयूर म्हेत्रे (महा) वि.वि. अमोद सबनीस (महा) 6-4, 4-6, 6-4, वेदांत भासीन (महा) (7) वि.वि. विवेक रेड्डी (तेलंगणा) 6-0, 6-0, क्रिश त्यागी (कर्नाटक) (4) वि.वि. आरव मिश्रा (महा) 6-1, 7-6(3), चैत्रा गलीवेटी रेड्डी (तेलंगणा) (5) वि.वि. ह्रिषिकेश रामनाथन (महा) 6-2, 6-1, राघव अमीन (महा) वि.वि. सूर्या काकडे (महा) 6-1, 6-1, श्री प्रणव तम्मा (कर्नाटक) (3) वि.वि. साहिल कोठारी (महा) 6-0, 6-2, अर्णव पापरकर (महा) (2) वि.वि. अर्णव बिशोई (तेलंगणा) 6-3, 6-3.
12 वर्षांखालील मुली – साई सहस्रा सर्वदेवभटला (तेलंगणा) वि.वि. सिया प्रसादे (महा) 6-3, 6-3, उर्वी काटे (महा) (6) वि.वि. ऐश्वर्या जाधव (महा) 6-3, 6-3, आस्मि आडकर (महा) (5) वि.वि. श्रीमान्या अनुगोंडा रेड्डी (तेलंगणा) 6-0, 6-1.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)