एमएसएलटीए योनेक्स सनराईज रवाईन हॉटेल 12 वर्षाखालील सुपर सिरीज् टेनिस स्पर्धा
पाचगणी – पुण्याच्या अर्णव पापरकर याने मुलांच्या गटात तर मुलींच्या गटात इकराजू कनूमुरी यांनी दुहेरी गटांतील विजेतेपदाबरोबरच एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश करत दुहेरी मुकुटाकडे वाटचाल करताना येथे सुरु असलेल्या रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होतअसलेल्या एमएसएलटीए योनेक्स सनराईज रवाईन हॉटेल 12 वर्षाखालील सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत विजयी आगेकूच नोंदवली आहे.
पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत उपांत्य फेरीत मुलांच्या गटात पाचव्या मानांकित तेलंगणाच्या चैत्रा गलीवेटी रेड्डी याने अव्वल मानांकित तामिळनाडूच्या महालिंगम खांडवेलचा 2-6,6-4,6-2 असा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली.
दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत दुसऱ्या मानांकित महाराष्ट्राच्या अर्णव पापरकर याने कर्नाटकच्या तिसऱ्या मानांकित श्री प्रणव तम्माचा 4-6,6-2,6-1असा तीन सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुहेरीत अंतिम फेरीत अर्णव पापरकरने व्रज गोहिलच्या साथीत रूरिक रजीनी व क्रिश त्यागी यांचा 2-6,6-1,10-8असा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
मुलींच्या गटात उपांत्य फेरीत तेलंगणाच्या अव्वल मानांकित इकराजू कनूमुरी हिने गुजरातच्या प्रियांका राणाचा 6-2, 6-1असा सहज पराभव करून अंतिम फेरी गाठली. आठव्या मानांकित महाराष्ट्राच्या प्राप्ती पाटीलने उत्तरप्रदेशच्या तिसऱ्या मानांकित सौमित्रा वर्माचा 6-1, 6-1असा एकतर्फी पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. दुहेरीत अंतिम फेरीच्या लढतीत इकराजू कनूमुरी व सोहिनी मोहंती या जोडीने श्रेया देशपांडे व आस्मि आडकर यांचा 6-4, 7-5असा पराभव करून विजेतेपद मिळवले.
सविस्तर निकाल :
उपांत्य फेरी : 12 वर्षांखालील मुले : चैत्रा गलीवेटी रेड्डी (तेलंगणा) (5) वि.वि. महालिंगम खांडवेल (तामिळनाडू) (1) 2-6, 6-4, 6-2, अर्णव पापरकर (महा) (2) वि.वि. श्री प्रणव तम्मा (कर्नाटक) (3) 4-6,6-2,6-1.
12 वर्षांखालील मुली : इकराजू कनूमुरी (तेलंगणा) (1) वि.वि. प्रियांका राणा (गुजरात) 6-2, 6-1, प्राप्ती पाटील (महा) (8) वि.वि. सौमित्रा वर्मा (उत्तरप्रदेश) (3) 6-1, 6-1.
दुहेरी : मुले : अंतिम फेरी : अर्णव पापरकर/व्रज गोहिल वि.वि. रूरिक रजीनी/क्रिश त्यागी 2-6,6-1,10-8.
दुहेरी : मुली : अंतिम फेरी : इकराजू कनूमुरी/सोहिनी मोहंती वि.वि. श्रेया देशपांडे/आस्मि आडकर 6-4, 7-5.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा