केविन अँडरसन टाटा ओपनमध्ये सहभागी होणार

पुणे – जागतिक क्रमवारीत 6 व्या स्थानावर असणारा दक्षिण आफ्रिकेचा केविन अँडरसन हा यंदाच्या टाटा ओपन महाराष्ट्रच्या दुसऱ्या पर्वात सहभागी होणार आहे. जानेवारी 2018 मध्ये झालेल्या स्पर्धेचा तो उपविजेता ठरला होता. टाटा ओपन ही स्पर्धा एटीपी साठी महत्वाची स्पर्धा असून या स्पर्धेतील विजेत्या खेलाडूला 250 एटीपी गुण दिले जातात.

मागील दोन दशकात टेनीस मोसमाच्या वर्षांतील शेवटची स्पर्धा एटीपी टूर फायनल्ससाठी पात्र ठरणारा तो दक्षिण आफ्रिकेचा एकमेव खेळाडू ठरला आहे. त्याने हा कारनामा व्हिएन्ना ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जपानच्या केई निशिकोरी याला पराभूत करून केला होता. आपल्या कारकिर्दीतील पाचवी एटीपी स्पर्धा जिंकणारा केविन अँडरसन एटीपी फायनल्समध्ये नोव्हाक जोकोविच, राफेल नदाल, रॉजर फेडरर, जुआन मार्टिन डेल पोट्रो, ऍलेक्‍झांडर झ्वेरेव्ह आणि केइ निशिकोरी यांच्याशी टक्कर घेणार आहे.

टाटा ओपन महाराष्ट्रचे सचिव प्रशांत सुतार यांनी अँडरसनच्या सहभागाची अधिकृत घोषणा करताना सांगितले की, मी अँडरसनला विम्ब्लडन स्पर्धेच्यावेळी भेटलो. त्याने या स्पर्धेच्या सहभागा विषयी इच्छुक असल्याचे सांगितले होते. त्याचबरोबर मागील वेळच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले होते. आम्ही त्याच्या या स्पर्धेतील सहभागाने खूप आनंदी आहोत आणि या स्पर्धेचे तो मुख्य आकर्षण असणार आहे.

केव्हिन अँडरसनने या वर्षीच्या विम्ब्लडन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. परंतु, तेथे त्याला अंतिम फेरीत सध्या जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असणाऱ्या नोव्हाक जोकोविच विरुद्ध पराभूत व्हावे लागले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)