सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धा : समीर,सायना, कश्‍यप उपांत्यपूर्व फेरीत दाखल

File Photo

नवी दिल्ली – गतविजेता समीर वर्मा, सायना नेहवाल, ऋतुपर्णा दास आणि पारुपल्ली कश्‍यप यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करताना सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडाक्‍यात प्रवेश केला आहे.

तीन वेळा सय्यद मोदी स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या द्वितीय मानांकित सायना नेहवालने अमोलिका सिंह सिसोदियाचा 21-14, 21-9 असा एकतर्फी पराभव करताना विजयी आगेकूच नोंदवली. याचप्रमाणे 2012 आणि 2015 मध्ये स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या कश्‍यपने इंडोनेशियाच्या फिर्मन अब्दुल खोलिकचा 9-21, 22-20, 21-8 असा संघर्षपूर्ण पराभव करताना स्पर्धेत आगेकूच केली.

आता कश्‍यपची उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या सिथ्थीकोम थमासिनशी लढत होणार आहे. तर, अन्य एका सामन्यात तृतीय मानांकित समीरने चीनच्या झाओ जुनपेंगला 22-20, 21-17 अशा संघर्षपूर्ण सामन्यानंतर पराभव केला. पुढील फेरीत त्याची चीनच्याच झोऊ झेकीशी गाठ पडणार आहे.

माजी ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायनाचा उपांत्यपूर्व फेरीत आठव्या मानांकित ऋतुपर्णा दासशी सामना होणार आहे. ऋतुपर्णाने श्रुती मुंदडाचा 21-11, 21-15 असा एकतर्फी पराभव केला. तर, चौथ्या मानांकित बी. साईप्रणितने इंडोनेशियाच्या शेसार हिरेन रुस्टाव्हिटोचा 21-12, 21-10 असा पराभव केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)