सिंधू, श्रीकांतचे आव्हान संपुष्टात

हॉंगकॉंग ओपन बॅडमिंटन स्पर्धा 2018

कोवलून – येथे होत असलेल्या हॉंगकॉंग ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपान्त्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारतीय बॅडमिंटन स्टार पी.व्ही.सिंधू आणि किदंबी श्रीकांतयांना पराभवाचा सामना करावा लागला असून महिला गटात भारतीय संघाचे आव्हान संपले असून पुरुष विभागातील सामन्यात किदंबी स्ग्रीकांतचे आव्हान संपुष्टात आले असून आता भारतीय संघाच्या सर्व आशा समीर वर्मावर अवलंबून आहेत.

-Ads-

उपान्त्यपूर्व फेरीच्या सामन्यात श्रीकांतचा जपानच्या केंटा निशिमोटो याने 21-17, 21-13 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. आणि स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. सामन्यात पहिल्या मिनिटापसूनच निशिमोटोने सामन्यावर वर्चस्व गाजवले. मात्र, श्रीकांतने पहिल्या सेट मध्ये वेळोवेळी पुनरागमन करत चांगला खेळ केला. सामन्यातील पहिला गुण निशिमोटो याने घेतल्यानंतर दोघांमध्ये चांगलीच झुंज रंगली. एकवेळ गेममध्ये दोघांची 15-15 अशी बरोबरी होती.

मात्र, त्यानंतर निशिमोटो याने नेटच्या जवळजात चांगले फटके खेळत सामन्यात आघाडी घेत पहिला सेट 21-17 असा जिंकला. श्रीकांत दुसऱ्यासेट मध्ये पुनरागमन करेल अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र, दुसऱ्या सेट मध्ये निशीमोटोने त्याच्यावर दडपण आणले आणि सामन्याच्या सुरुवातीलाच आघाडी घेतली. त्यामुळे श्रीकांतने दडपणात येत दुसरा सेट 21-13 असा सहज गमावला.

तर, महिला एकेरीच्या गटात भारताच्या पी व्ही सिंधूचे आव्हान कोरियाच्या सुंग जी ह्यून हिने 26-24, 22-20 असे संघर्षपूर्ण सामन्यानंतर संपुष्टात आणले. यावेळी सामन्यातील पहिला गेम अत्यंत अटीतटीचा झाला. सामन्याच्या सुरुवातीला सिंधूने 2 तर सुंग जी ह्यून हिने 6 गुण कमावले होते. त्यानंतर सिंधूने पुनरागमन करताना सामन्यात 6-6 अशी बरोबरी साधली होती. त्यानंतर सुंग जी ह्यून हिने पुन्हा एकदा आघाडी घेत 18-13 अशी गुण संख्या आणली.

मात्र, सामन्यात सिंधूने पुन्हा एकदा पुनरागमन करत 20-20 अशी बरोबरी साधली. अखेर 24-24 अशी बरोबरी असताना सुंग जी ह्यून हिने दोन गुण कमावत पहिला गेम 26-24 असा जिंकला. त्यानंतरचा दुसरा गेमही अटीतटीचा झाला. या गेम मध्ये सिंधूने पहिल्या गेम प्रमाणेच पुनरागमनाचे भरपूर प्रयत्न केले मात्र, त्यात तिला अपयश आले.

यागेम मध्ये सामन्याच्या सुरुवातीपासूनच सुंग जी ह्युनने सिंधूवर वर्चस्व मिळवले होते. मात्र, सिंधूने पुन्ह आपल्यावरील दडपन झुगारून देत सामन्यात पुनरागमन केले होते. यावेळी 20-20 अश्‍या बरोबरीत खेळ असताना सुंग जी ह्युनने पुन्हा दोन गुण कमावताना सिंधूचा पराभव करत साम्ना जिंकत उपान्त्य फेरीत प्रवेश केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)