आंतरराष्ट्रीय धावपटू ‘पलेंदर चौधरी’ची आत्महत्या

धावपटूच्या आत्महत्या प्रकरणाचे ‘साई’ चे चौकशीचे आदेश

नवी दिल्ली  – भारताचा आंतरराष्ट्रीय धावपटू पलेंदर चौधरीने दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी घडला. गोंडा येथील कॅमथल ठाना येथील पलेंदर हा जवाहरलाल नेहरू स्टेडियममधील ऍथलीट अकादमीत राहत होता. त्याने हॉस्टेलच्या खोलीत पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी भारतीय क्रीडा प्राधिकरणने (साई) चौकशीचे आदेश दिले आहेत.

आत्महत्येची घटना ही जवाहरलाल नेहरू स्टेडियमधील अकादमीच्या परिसरात घडली आहे. त्यामुळे या प्रकरणी आम्ही विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याच बरोबर साईचे सचिव स्वर्ण सिंग छाबरा यांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी होणार आहे. आठवडाभरात ही चौकशी पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती साईचे महासंचालक नीलम कपूर यांनी पीटीआयला सांगितले आहे.

जवाहरलाल नेहरू स्टेडिअम परिसरातील अकादमीत असलेल्या वसतीगृहात तो राहात होता. पलेंदर सराव संपवून सायंकाळी साडेपाच वाजता आपल्या खोलीत परतला होता. त्यानंतर साडेसहाच्या आसपास त्याने खोलीत गळफास घेतला, असे सांगितले जात आहे. पलेंदरने आत्महत्या का केली, याचे कारण अद्यापही समजू शकलेले नाही. तसेच पोलीस या प्रकरणी तपास करत असल्याची माहिती मिळाली आहे.

सोमवारी सकाळी त्याचे वडिलांशी फोनवर भांडण झाले होते. त्यानंतर त्याची बहीण अकादमीत त्याला भेटण्यासाठी आली होती आणि तिने त्याच्याशी चर्चा केली होती. दुर्दैवाने आम्ही त्याला वाचवू शकलो नाही, अशी माहिती भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याने दिली आहे.

यावेळी पलेंदरच्या घरच्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, त्याला पैसे हवे होते. त्याला मी ते लवकरच देणार असल्याचे आश्‍वासन दिले होते. पण, त्यानंतर काय घडले याची मला कल्पना नाही. स्टेडियममधील कोणावरही माझी तक्रार नाही, असे पलेंदर चौधरीच्या वडिलांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)