पॉन्टिंग ऑस्ट्रेलिया संघावर भडकला

सिडनी – चौथ्या कसोटीत भारतीय संघाने 622 धावांवर आपला डाव घोषित केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 300 धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडून या सामन्यात अपेक्षित कामगिरी पाहायला मिळाली नाही. सलामीवीर मार्कस हॅरिस वगळता एकाही फलंदाजाला अर्धशतकी खेळी करता आली नाही. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी अशी असमाधानकारक खेळी केल्यामुळे माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग त्यांच्या संघावर चांगलाच भडकला असून तुम्हाला जिंकावेसे वाततच नाही का? असा सवाल ही त्याने यावेळी केला आहे.

तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची अवस्था 6 बाद 236 होती. त्यानंतर तळाच्या फलंदाजांनी काही काळ झुंज दिली. पण नॅथन लॉयनला ज्या चेंडूवर बाद देण्यात आले, तो निर्णय साशंक होता. अशा वेळी ऑस्ट्रेलियाकडे 2 रिव्ह्यू शिल्लक असतानाही लॉयनने तो का वापरला नाही. तो सरळ मैदानाबाहेर निघून गेला. यावरून ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्याची किंवा वाचवण्याची अजिबात इच्छा नसल्याचे स्पष्ट दिसून येते, अशा शब्दात पॉन्टिंगने आपला राग व्यक्त केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)