#AUSvIND : रवी शास्त्रींनी टिकाकारांना टोलवले

सिडनी – ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका विजय मिळविल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सुनील गावसकर सह अन्य टीकाकारांना चोख उत्तर देताना म्हटले की, माझा संघ रिकाम्या बंदुकीतून गोळ्या झाडत नाही. दुरून टीका करणाऱ्यांची विधाने ही “ट्रेसर बुलेट’ प्रमाणे असून आमच्या कामगिरीमुळे त्यांची टिका निष्प्रभ ठरली आहे.

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर 71 वर्षात पहिला कसोटी मालिका विजय मिळवला आहे. भारतीय संघाने मालिकेतील पहिला कसोटी सामना जिंकल्यावर दुसरा सामना पर्थच्या मैदानावर गमावला होता. त्यामुळे मालिका 1-1 अशी बरोबरीत आली होती. त्यावेळी माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी भारतीय संघ निवडीवर आणि रणनितीवर प्रश्न उपस्थीत करताना टीका केला होती तर भारताचा माजी खेळाडू आणि समालोचक मुरली कार्तिकनेही “पर्थमधील पराभव हा जागे होण्याची वेळ’ असे म्हणत नाराजी व्यक्त केली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारतीय संघाने 2-1 असा मालिका विजय मिळवल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शास्त्री म्हणाले की, मी मेलबर्न कसोटीच्या अगोदरही आमच्यावर टीका करणाऱ्याना उत्तर दिले होते. माझ्या खेळाडूंच्या प्रतिभेवर मला विश्वास होता आणि सामना जिंकण्याच्या प्रेरणेने ते किती झपाटले आहेत याचा मला नेमका अंदाज होता. म्हणून मी दक्षिण गोलार्धातून ऑस्ट्रेलियामध्ये टीका करणाऱ्यांच्या विधानांना फारसे महत्त्व दिले नाही, असेही ते म्हणाले.

मालिकेत विजय संपादन केल्यानंतर भारतीय संघाची स्तुती करताना शास्त्री म्हणाले, हा असा भारतीय संघ आहे जो सामना जिंकण्यासाठी कड्यावरूनही उडी घेण्याची मानसिकता ठेवतो. त्यांच्यामध्ये दृढनिश्‍चय आहे तर गरजेच्यावेळी कणखरपणा दाखवण्यातही हा संघ कमी पडत नाही. या संपूर्ण मालिकेत विजयाच्या प्रेरणेने खेळत त्यांनी जे धैर्य दाखवले आहे त्याला मी सलाम करतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)