हेमंत पाटील क्रिकेट अकादमी ‘अ’ संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश

महाराष्ट्र क्रिकेट प्रिमियर लीग 2019 स्पर्धा

पुणे – अवधूत दांडेकर (127 धावा) याने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर हेमंत पाटील क्रिकेट अकादमी अ संघाने क्‍लब ऑफ महाराष्ट्र संघाचा 72 धावांनी पराभव करून सलग दुसरा विजय मिळवत हेमंत पाटील प्रतिष्ठान यांच्या तर्फे व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट प्रिमियर लीग 2019 एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

नेहरू स्टेडियम येथील क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत प्रथम फलंदाजी करताना हेमंत पाटील क्रिकेट अकादमी अ संघाने 45 षटकांत 8 बाद 233 धावांचे आव्हान उभे केले. यामध्ये अवधूत दांडेकर याने धडाकेबाज फलंदाजी करत 97 चेंडूत 17 चौकार व 1षटकारासह 127 धावांची शतकी खेळी केली. अवधूतला प्रसन्ना मोरेने 41, सागर मगरने 18, हितेश वाळुंजने 14 धावा काढून साथ देत संघाला 233 धावा उभारून दिल्या.

क्‍लब ऑफ महाराष्ट्र संघाकडून निकित धुमाळने 49 धावात 4 गडी बाद करून हेमंत पाटील क्रिकेट अकादमीला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. 233 धावांचे आव्हान क्‍लब ऑफ महाराष्ट्र संघ पेलू शकला नाही व त्यांचा डाव 161 धावांवर संपुष्टात आला. यश क्षीरसागर 27, युवराज झगडे 24, सुजित उबाळे 22, रजनीकांत पडवळ 23यांनी दिलेली लढत अपुरी ठरली.

हेमंत पाटील क्रिकेट अकादमीकडून अविनाश शिंदे 2-17, शुभम कोठारी 2-23, हितेश वाळुंज 2-24, सागर होगाडे 2-25 यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून संघाला विजय मिळवून दिला. सामनावीर शतकी खेळी करणारा अवधूत दांडेकर ठरला. स्पर्धेच्या उपांत्य फेरीत केडन्स क्रिकेट अकादमीचा सामना युनायटेड क्रिकेट कलब संघाशी तर, दुसरा सामना हेमंत पाटील क्रिकेट अकादमी अ संघ व डेक्कन जिमखाना इलेव्हन यांच्यात होणार आहे.

सविस्तर निकाल –

साखळी फेरी : हेमंत पाटील क्रिकेट अकादमी अ – 45 षटकांत 8 बाद 233 (अवधूत दांडेकर 127 ( 97, 17चौकार, 1षटकार), प्रसन्ना मोरे 41 (63,7 चौकार), सागर मगर 18, हितेश वाळुंज 14, निकित धुमाळ 4-49, सय्यद अतिफ जमाल 2-51, प्रज्वल गुंड 1-29) वि.वि. क्‍लब ऑफ महाराष्ट ्र: 34 षटकांत सर्वबाद 161 (यश क्षीरसागर 27(29), युवराज झगडे 24(54), सुजित उबाळे 22(19), रजनीकांत पडवळ 23(23), अविनाश शिंदे 2-17, शुभम कोठारी 2-23, हितेश वाळुंज 2-24, सागर होगाडे 2-25) सामनावीर-अवधूत दांडेकर.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)